शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

नेताजींबाबतचे गूढ उलगडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2016 03:36 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फाईल्स त्यांच्या जयंतीला म्हणजे शनिवारी सार्वजनिक करण्यात येणार असून यामुळे नेताजींच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फाईल्स त्यांच्या जयंतीला म्हणजे शनिवारी सार्वजनिक करण्यात येणार असून यामुळे नेताजींच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या फाईल्स सार्वजनिक करण्यात येणार आहेत. येथे आयोजित एका समारंभात मोदी या फाईल्सच्या डिजिटल प्रती प्रसिद्ध करतील. गेल्या वर्षी १४ आॅक्टोबरला नेताजींच्या कुटुंबियांनी पंतप्रधानांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी मोदींनी नेताजींशी संबंधित फाईल्स सरकार सार्वजनिक करेल अशी ग्वाही त्यांना दिली होती. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ४ डिसेंबरला ३३ फाईल्स सार्वजनिक करण्यासाठी राष्ट्रीय अभिलेखागाराच्या सुपूर्द केल्या होत्या. दरम्यान, नेताजींच्या कन्या अनिता बोस यांनी आपल्या वडिलांचा विमान अपघातात मृत्यू झाला असण्याची पूर्ण शक्यता आहे; परंतु आणखी काही पुरावे समोर आल्यास आपण खुल्या मनाने हे स्वीकारण्यास तयार आहोत,अशी भावना व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, नेताजींशी संबंधित या फाईल्स सार्वजनिक झाल्याने आणखी काही तथ्य समोर येण्याची शक्यता नाही. याऐवजी भारत सरकारने जपान सरकारच्या मदतीने रिनकोजी मंदिरात ठेवण्यात आलेल्या त्यांच्या अस्थींची डीएनए चाचणी करून घ्यावी म्हणजे या संपूर्ण वादावर पडदा पडेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)१९९७ साली अभिलेखागाराला आझाद हिंद सेनेशी संबंधित ९९० फाईल्स संरक्षण मंत्रालयाकडून मिळाल्या होत्या. त्यानंतर २०१२ मध्ये गृहमंत्रालयाने नेताजींच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या खोसला आयोगाच्या १०३० फाईल्स व दस्तावेज तसेच मुखर्जी आयोगाच्या ७५० फाईल्स आणि दस्तावेज सोपविले होते. हे दस्तावेज यापूर्वीच जाहीर झाले आहेत.फाईल्स सार्वजनिक करण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर गृह आणि विदेश मंत्रालयानेही त्यांच्याजवळील फाईल्स सार्वजनिक करण्याची प्रक्रिया सुरू करून त्या अभिलेखागाराच्या सुपूर्द केल्या होत्या. सुरुवातीला १०० फाईल्स सार्वजनिक करण्यात येणार असून त्यांचे डिजिटलीकरण केले आहे. या फाईल्स चांगल्या पद्धतीने सांभाळण्यात आल्या असून अभिलेखागाराने दर महिन्याला २५ फाईल्सच्या डिजिटल प्रती लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.