शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मोदी अचानक लाहोरला का गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 23:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना असे कोणते आश्वासन मिळाले होते की अचानक ते लाहोरला गेले? सरकार नेमके काय करू इच्छिते? याचे उत्तर देशाला हवे आहे.

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदींना असे कोणते आश्वासन मिळाले होते की अचानक ते लाहोरला गेले? सरकार नेमके काय करू इच्छिते? याचे उत्तर देशाला हवे आहे. आपले परराष्ट्र धोरणही सरकारने लवकरात लवकर स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.पठाणकोट हवाईदल तळावरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर चौथ्या दिवशी, काँग्रेसतर्फे कठोर प्रतिक्रिया व्यक्त करतांना गंभीर स्वरात शर्मा म्हणाले, पठाणकोटची घटना केवळ दहशतवादी हल्ला नसून साऱ्या देशावर चढवण्यात आलेला हल्ला आहे. त्याला चोख प्रत्युत्तर देतांना वीरमरण आलेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करीत शर्मा पुढे म्हणाले, हे आव्हान इतक्या गंभीर स्वरूपाचे आहे की दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात एका सुरात साऱ्या देशातून आवाज उठला पाहिजे. काँग्रेस पक्ष अशा प्रसंगात अर्थातच देशाबरोबर आहे. तथापि या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत, सरकारकडून ज्याचे उत्तर साऱ्या देशाला हवे आहे.सरकारला सवाल विचारीत शर्मा म्हणाले, आॅगस्ट महिन्यात उभय देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची नियोजित चर्चा रद्द करण्यात आली. त्यानंतर बँकॉकमधे दोन्ही सुरक्षा सल्लागारांची अचानक बैठक झाली. त्या चर्चेतून नेमके काय निष्पन्न झाले? पंतप्रधानांची या चर्चेला संमती होती काय? रशियाच्या उफा आणि फ्रान्सच्या पॅरिस शहरात पंतप्रधान मोदी नवाज शरीफाना भेटले. त्या भेटीत असे कोणते आश्वासन मोदींना मिळाले की अफगाणिस्तानातून परततांना पंतप्रधानांना अचानक लाहोरला जावेसे वाटले? विशेष म्हणजे लाहोर भेटी प्रसंगी पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार जंजुआ उपस्थित नव्हते. त्यामुळे भारताबरोबरच्या चर्चेत पाकिस्तानात एकमत नाही असे चित्र दिसू लागले. एकप्रकारे भारताला हा इशाराच नव्हता काय? लाहोर भेटीत पंतप्रधानांनी नेमके काय साधले, ते तिथे का गेले होते? याची कोणतीही माहिती देशाला नाही. त्याची स्पष्ट उत्तरे सरकारने दिली पाहिजेत, असेही शर्मा म्हणाले.