शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लाेकप्रतिनिधींना शैक्षणिक पात्रता का नाही? पंजाब-हरयाणा हायकोर्टाचा सवाल, पहिल्या राष्ट्रपतींच्या चिंतेकडे वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 07:26 IST

Court News: आमदार, खासदार किंवा मंत्री होण्यासाठी किमान पात्रता अनिवार्य न केल्याबद्दल भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी खेद व्यक्त केला होता. राज्यघटना स्वीकारून ७५ वर्षे झाली तरी याची अद्याप दखल  घेतली गेली नाही, अशी खंत पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.  

- डॉ. खुशालचंद बाहेती  चंडीगड - आमदार, खासदार किंवा मंत्री होण्यासाठी किमान पात्रता अनिवार्य न केल्याबद्दल भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी खेद व्यक्त केला होता. राज्यघटना स्वीकारून ७५ वर्षे झाली तरी याची अद्याप दखल  घेतली गेली नाही, अशी खंत पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.   

हरिंदर धिंग्रा यांनी २००५ मध्ये भाजपचे तत्कालीन आमदार नरबीर सिंग यांच्याविरोधात न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली होती. सिंग यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद पदवी विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेल्या विद्यापीठाची नसल्याचा आरोप केला होता. सिंग यांच्याकडे पदवी प्रमाणपत्र आहे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता त्यांच्या नियंत्रणात नाही, असे निरीक्षण नोंदवत प्राथमिक टप्प्यावर तक्रार फेटाळली होती. धिंग्रा यांनी हायकोर्टात फेरविचार याचिका दाखल केली. न्यायमूर्ती महाबीर सिंग सिंधू यांनी जिल्हा न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला. लोकप्रतिनिधींच्या शैक्षणिक पात्रतेच्या निकषांबाबत हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले की, डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आमदार, खासदारांसाठी किमान शैक्षणिक पात्रता अनिवार्य नसल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. याची अद्याप दखल घेतलेली नाही. हे ‘सुशिक्षित नागरिकांसाठी डोळे उघडणारे आहे.’ 

काय म्हणाले होते पहिले राष्ट्रपती?डॉ. राजेंद्र प्रसाद (संविधान सभेचे अध्यक्ष) यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यापूर्वी व्यक्त केलेल्या भावना…- मला विधिमंडळाच्या सदस्यांसाठी किमान पात्रता निश्चित करणे आवडले असते.- कायद्याची अंमलबजावणी  करणाऱ्यांसाठी आपण शैक्षणिक पात्रतेचा आग्रह धरतो. परंतु, कायदा बनवणाऱ्यांसाठी किमान शैक्षणिक पात्रता नसणे विसंगत आहे.- आमदार, खासदार तसेच मंत्री होण्यासाठी आपल्या देशात एकमेव पात्रता म्हणजे त्यांचे निवडून येणे हीच आहे. - जोपर्यंत आपल्या विधिमंडळ सदस्यांसाठी पात्रतेचे निकष लागू केले जाणार नाहीत, तोपर्यंत आपली राज्यघटना सदोष राहणार आहे.