नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपने युजर्सच्या गुप्ततेच्या धोरणाला सोडचिठ्ठी देत, युजर्सची माहिती फेसबुकशी शेअर करण्याचा निर्णय घेतला असून, व्हॉट्सअॅप तुमचा मोबाइल नंबरही व माहिती फेसबुकशी शेअर करेल. फेसबुकच्या जाहिराती व्हॉट्सअॅप युजर्सपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने हे केले आहे. फेसबुक खासगी माहितीचा वापर जाहिरातीसाठी करते. आता व्हॉट्सअॅपवर दिसू लागल्यास डोक्याचा ताप वाढेल. या जाहिराती फेसबुकवर असतील, त्याचा व्हॉट्सअॅप जाहिरातींशी काहीही संबंध नसेल, असा कंपनीचा दावा आहे. आमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवता येईल, याचीही आम्ही चाचपणी करत आहोत, असेही व्हॉट्सअपने म्हटले आहे. मात्र, हे पाऊल उचलण्यापूर्वी जगभरातील हजारो कोटी युजर्सचा डेटा सुरक्षित राहील, हा विश्वास व्हॉट्सअॅपने देणे गरजेचे आहे.या निर्णयामुळे फेसबुकला सर्व व्हॉट्सअॅप युजर्सचे मोबाइल नंबर मिळू शकतील. याचाच अर्थ, मोबाइल क्र मांक व माहिती फेसबुकला उपलब्ध होतील. व्हॉट्सअॅपच्या क्रमांक फेसबुकला शेअर करायचे नसेल तर... व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन अकाउंट हा आॅप्शन निवडावा. त्या ‘शेअर माय इन्फो’समोरील ‘बरोबर’चे चिन्ह काढून टाकावे.व्हॉट्सअॅपच्या या निर्णयामुळे युजर्सची खासगी माहिती उघड होत असल्याने त्याला विरोध होताना दिसत आहे. तसे होणे स्वाभाविकच आहे. - 14.20कोटी फेसबुक युजर्स भारतात- 69लाख युजर्स रोज फेसबुकवर- 90%युजर्स मोबाइलवर फेसबुक वापरतात-07कोटी व्हॉटस्अप युजर्स भारतात
व्हॉट्सअॅपचा नंबर फेसबुकवर शेअर!
By admin | Updated: August 28, 2016 05:20 IST