शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कुजबूज - सरकारी जावई

By admin | Updated: April 15, 2015 00:03 IST

मडगावातील हॉस्पिसिओ इस्पितळात अल्ट्रासाउंड मशिन दर दोन दिवसांनी खराब होत असल्याचे मशिन ऑपरेट करणार्‍या ऑपरेटर्सकडून सांगितले जाते; परंतु असे का सांगितले जाते याची इस्पितळाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती खूपच गंमतीशीर निघाली, हा ऑपरेटर म्हणे उत्तर गोव्याचा असून तो मनाला वाटेल तसा वागतो कधीही वेळेवर ड्युटीवर येत नाही व आलाच तर मशिन खराब झाल्याचे कारण पुढे करून दुपारी दीड वाजताच निघून जातो. या ऑपरेटरवर कुणाचेही कंट्रोल नसल्याने त्याचे आयतेच फावते. हा ऑपरेटर आपण सरकारी जावई असल्यासारखा वागत असल्याची चर्चा इस्पितळाच्या आवारात सुरू आहे. आरोग्यमंत्री बदलला; पण हॉस्पिसिओची परवड काही थांबली नाही, हेच खरे.

मडगावातील हॉस्पिसिओ इस्पितळात अल्ट्रासाउंड मशिन दर दोन दिवसांनी खराब होत असल्याचे मशिन ऑपरेट करणार्‍या ऑपरेटर्सकडून सांगितले जाते; परंतु असे का सांगितले जाते याची इस्पितळाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती खूपच गंमतीशीर निघाली, हा ऑपरेटर म्हणे उत्तर गोव्याचा असून तो मनाला वाटेल तसा वागतो कधीही वेळेवर ड्युटीवर येत नाही व आलाच तर मशिन खराब झाल्याचे कारण पुढे करून दुपारी दीड वाजताच निघून जातो. या ऑपरेटरवर कुणाचेही कंट्रोल नसल्याने त्याचे आयतेच फावते. हा ऑपरेटर आपण सरकारी जावई असल्यासारखा वागत असल्याची चर्चा इस्पितळाच्या आवारात सुरू आहे. आरोग्यमंत्री बदलला; पण हॉस्पिसिओची परवड काही थांबली नाही, हेच खरे.

आणि आता पत्रकयुद्ध...
विधानसभा निवडणुकीला अजून किमान दीड वर्षांचा अवकाश आहे; पण कुंकळ्ळी मतदारसंघात आताच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सोमवारी या स्तंभात आम्ही कुंकळ्ळीतील बॅनर युद्धाचा किस्सा प्रसिद्ध केला होता. या बॅनर युद्धाची सध्या खमंग चर्चा कुंकळ्ळीत चालू असतानाच मंगळवारी कुंकळ्ळीतून वितरित झालेल्या वृत्तपत्रातून ॲड. जॉन मोन्तेरो यांचे पत्रक कित्येकांच्या हाती पडले. मागच्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीवेळी कुंकळ्ळीचे माजी आमदार ज्योकिम आलेमाव आणि जॉन मोन्तेरो या दोघांनीही एका महिला उमेदवाराला पाठिंबा दिला होता. यावरून जॉन आणि ज्योकिम जवळ आले, असा त्यांच्यावर आरोप केला होता. या पत्रकातून जॉनने आपल्यावरील आरोप खोडून काढला आहे आणि आपण अजूनही ज्योकिमच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले आहे. जॉन मोन्तेरो यांचे हे पत्र पुन्हा एकदा कुंकळ्ळीत चर्चेचा विषय बनले आहे; पण फक्त पत्रके काढली म्हणून मते पडतात का?