कुजबूज
By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST
आणि आथरूरांचे डोळे पाणावले
कुजबूज
आणि आथरूरांचे डोळे पाणावलेमडगाव पालिकेत बुधवारी शताब्दी कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा होता. प्रमुख पाहुणे म्हणून कामगारमंत्री आवेर्तान फुर्तादो होते. फुर्तादो यांचे भाषण झाल्यावर नगराध्यक्ष आथरूर डिसिल्वा भाषणास उभे राहिले. त्यांनी स्वाभाविकच जैका लुईस बर्जर प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचे मत मांडले. आपण केवळ माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सांगण्यावरून त्यांचे काम केले. आपल्याला या प्रकरणात नाहक गोवण्यात आले. आपला त्या प्रकरणाशी काहीच संबंध नाही असे सांगताना त्यांना रडू कोसळले. जामीन मंजूर झाला असून त्या प्रकरणातून आपल्याला आता वगळण्यात आले, असे त्यांनी सांगितले. खरे म्हणजे आपण या कार्यक्रमात असले बोलू नये; परंतु बोलल्याशिवाय राहवत नसल्याने बोललो, असे ते म्हणाले.