शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

कुठे छत्रपती शिवाजी महाराज नी कुठे गांधी घराणे - पंतप्रधान मोदींचा नाव न घेता वार

By admin | Updated: June 13, 2016 18:56 IST

भारतीय जनता पार्टीची प्रतिमा जनमानसात चांगली राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना 7 पॉइंट अजेंडा दिला आहे

ऑनलाइन लोकमत
अलाहाबाद, दि. 13 - भारतीय जनता पार्टीची प्रतिमा जनमानसात चांगली राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना 7 पॉइंट अजेंडा दिला आहे. केवळ घोषणाबाजी करून शांत न बसता या सात मंत्रांचे पालन करावे असे आवाहन मोदींनी केले आहे.  विशेष म्हणजे, मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं आणि त्यांनी सत्ता असून सत्तेची फळं चाखली नाहीत असा दाखला दिला. त्याचबरोबर महाराजांच्या वर्तणुकीच्या विरोधाभासाचं उदाहरण देताना मोदींनी काहीजण सत्ताधीश नसूनही सत्तेची फळं चाखतात असा नाव न घेता सोनिया गांधींवर हल्ला चढवला. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपप्रसंगी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
 
केवळ घोषणाबाजी करून भागणार नाही
 
पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी धार्मिकदृष्ट्या संवेदनशील भागातून हिंदू स्थलांतर करत असल्याचा दाखला दिला, मात्र मोदींनी यासंदर्भात भाष्य टाळताना समाजाच्या भल्यासाठी सत्तेचा वापर करा असा सल्ला दिल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
आपण इतिहास घडताना बघत आहोत आणि अनेक वर्षांच्या मेहनतीची फळं विविध राज्यांमध्ये सत्ता स्थापन मिळवत आहोत असं मोदी म्हणाले. मात्र, ही सत्ता मिळाल्यामुळे विचलित न होता, समाजाच्या भल्यासाठी सत्ता राबवायला हवी असा सल्ला त्यांनी दिला. लोक केवळ घोषणांनी तृप्त होत नाहीत, त्यांना राष्ट्र कसे समर्थ होईल याची चिंता असते असे मोदी म्हणाले.
 
7 पॉइंट अजेंडा
 
मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांना 7 पॉइंट अजेंडा दिला असून मंत्रांप्रमाणे त्याचे पालन करावे असे आवाहन केले आहे. हा अजेंडा आहे...
 
- सेवाभाव
- संतुलन
- संयम
- समन्वय
- सकारात्मकता
- संवेदनशीलता
आणि 
- संवाद