शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी रोटी’ दिसताच बसपा आमदाराचा घास अडकला

By admin | Updated: May 7, 2014 08:58 IST

धाब्यावर जेवन करीत असताना ताटात अचानक नरेंद्र मोदींचे नाव असलेली पोळी दिसताच बसपा आमदाराचा पारा चढला आणि त्याने धाबा मालकाला धारेवर धरले.

वाराणशी : धाब्यावर जेवन करीत असताना ताटात अचानक नरेंद्र मोदींचे नाव असलेली पोळी दिसताच बसपा आमदाराचा पारा चढला आणि त्याने धाबा मालकाला धारेवर धरले. मंगळवारी दुपारी वाराणशीतील यादव धाब्यावर हे संताप नाट्य घडले. मालकाने दुसरी पोळी दिल्यानंतरच बसपा आमदाराने नंतर जेवन सुरु केले. या प्रकाराची वार्ता वार्‍यासारखी पोहोचताच पोलिस तिथे पोहोचले आणि त्यांनी या पोळ्या ग्राहकांना देण्यास बंदी घातली. त्याचे झाले असे की, नरेंद्र मोदी यांची ‘मिशन २७२’ची एक चमू सध्या वाराणशीत तळ ठोकून आहे. या चमूचे विदर्भाचे प्रमुख अरविंद देठे (अकोला) गुरूदिपसिंग (दिल्ली), प्रमोद सिंग (बिलासपूर) यांनी पोळ्या तयार करणारे एक यंत्र इथे आणले आहे. या मशीनमधून तयार होणार्‍या पोळीवर ‘अबकी बार मोदी सरकार’असे प्रिन्ट होते. येथील यादव धाब्याच्या मालकाने ‘मिशन २७२’चमूकडून हे मशीन विकत घेतले आहे. आज दुपारी इथे झांशी येथील बसपाचे आमदार सीताराम कुशवाह जेवायला आले. आमदार महोदयांनी जेवायला सुरुवात केल्यानंतर या ‘मोदी ब्रान्ड पोळी’चे ब्रान्डींग करण्यासाठी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले. त्यात इलेक्ट्रॉनिक चॅनेलचे प्रतिनिधीसुद्धा होते. धाब्यावर अचानक झालेली गर्दी पाहून आमदार कुशवाह काहीसे गडबडले. चॅनेलच्या कॅमेर्‍याचा झोत त्यांच्या ताटातील पोळीवर पडताच कुशवाह भडकले. पण तोपर्यंत त्यांच्या दोन-तीन पोळ्या खावून झाल्या होत्या. ते कसनुुसे करु लागले. घास तोंडातच फिरवित ‘अल्पसंख्यकांच्या तोंडातला घास पळविणार्‍या मोदीची पोळी मी कशी खाणार’असे म्हणत त्यांनी धाबा मालकाची खरडपट्टी काढायला सुरुवात केली. शेवटी दुसरी पोळी दिल्यानंतर ते शांत झाले आणि त्यांनी जेवण आटोपले. पण काही क्षणासाठी धाब्यावरची भट्टी आणि आमदाराचे डोके जाम भडकले होते. (विशेष प्रतिनिधी)