शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअॅप जुनाच 'स्टेटस' पुन्हा ठेवणार

By admin | Updated: February 25, 2017 21:07 IST

व्हॉट्सअॅपने नुकतंच लाँच केलेलं स्टेटस फिचर अनेक युजर्सना अजिबात आवडलेलं नसून अनेकांनी हा बदल केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - व्हॉट्सअॅपने नुकतंच लाँच केलेलं स्टेटस फिचर अनेक युजर्सना अजिबात आवडलेलं नसून अनेकांनी हा बदल केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी जुनंच स्टेटस फिचर जास्त चांगलं होतं असं मत व्यक्त केलं आहे. युजर्सकडून नकारात्मक प्रतिक्रिया येत असल्याने व्हॉट्सअॅप पुन्हा एकदा आपलं जुनं स्टेटस फिचर आणण्याचा विचार करत आहे, ज्यामध्ये फक्त शब्दांमधून व्यक्त करण्याची संधी मिळत होती. 
 
 
व्हॉट्सअॅ्पनं गुरुवारी आपल्या 8व्या वाढदिवसानिमित्त ‘स्टेटस’ फीचर लाँच केलं होतं. यानुसार  युजर्सना स्टेटसमध्ये फक्त टेक्स्ट न टाकता फोटो, व्हिडीओ आणि GIF अपलोड करण्याचा पर्याय दिला आहे. मात्र हा बदल खूपच त्रासदायक असून जुनं फिचर जास्त सोयीस्कर होतं असं अनेक युजर्सनी म्हटलं आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅ्पकडून जुनं फीचर हे नव्या नावानं रिलाँच केलं जाऊ शकतं. काही वृत्तानुसार, कंपनी आपलं जुनं फीचर Tagline नावानं पुन्हा आणू शकतं. व्हॉट्सअॅपसंबंधी माहिती लीक करणारं ट्विटर हॅण्डल WABetaInfo ही माहिती शेअर केली आहे.
 
मुळात नवं फिचर आलं आहे, यापेक्षा जुना टेक्स्टचा पर्याय गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच ठेवलेला फोटो किंवा स्टेटसचा सर्वांना अलर्ट जातो हेदेखील अनेकांना आवडलेलं नाही. 
 
व्हॉट्सअॅ्पचं नवं फिचर व्हॉट्सअॅप स्टेसमध्ये टेक्स्टच्या ऐवजी एक छोटा व्हिडीओ टाकणं शक्य आहे. ही सोय किंवा फिचर इंस्टाग्रामवर (Instagram Stories) उपलब्ध असून स्नॅपचॅटशी मिळतं जुळतं आहे. हे व्हॉट्सअॅप स्टेटस 24 तासानंतर आपोआप गायब होते.