शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कुुत्र्याला दगड मारला तर सरकारचा काय संबंध - दलित हत्याकांडावरून व्ही. के. सिंग यांचा सवाल

By admin | Updated: October 22, 2015 13:19 IST

एखाद्या व्यक्तीने कुत्र्याला दगड मारला तर त्याचा सरकारशी काय संबंध असे वादग्रस्त विधान करत व्ही. के. सिंग यांनी दलित हत्याकांडाचा सरकारशी संबंध जोडू नका असे म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २२ -  स्थानिक मुद्यांचा केंद्र सरकारशी संबंध जोडू नका, ते तेथील प्रशासनाचे अपयश असे सांगत हरियाणातील दलित हत्याकांडासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरता येणार नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी केले आहे. समजा उद्या जर एखाद्याने कुत्र्याला दगड मारला तर त्याला सरकार कसे जबाबदार असेल असा खळबळजनक प्रश्न विचारत त्यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. दलित हत्याकांडांसारख्या संवदेनशील घटनेला व्ही. के. सिंग यांनी शुल्लक ठरवत सरकारची जबाबदारी झटकल्याने विरोधाकांनी तीव्र शब्दांत नाराजी नोंदवली आहे.

मंगळवारी पहाटे हरियणातील फरिदाबाद येथे एका दलित कुटुंबावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्यात आले होते, त्यात दोन बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेचे राजकीय पडसाद उमटले असून विरोधकांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आरोपीच्या पिंज-यात उभे केले.

मात्र या घटनेचा केंद्र सरकारशी काहीही संबंध नसल्याचे सांगत ही घटना तेथील स्थानिक प्रशासनाच्या अपयशामुळे घडल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.