शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांच्या ‘करात’ काय?

By admin | Updated: March 1, 2016 03:43 IST

वैयक्तिक आयकराच्या स्लॅबमध्ये अर्थमंत्र्यांनी कोणताही बदल केलेला नाही. तथापि, कलम ८७ अन्वये कर सवलतीत बदल केला आहे

नवी दिल्ली : वैयक्तिक आयकराच्या स्लॅबमध्ये अर्थमंत्र्यांनी कोणताही बदल केलेला नाही. तथापि, कलम ८७ अन्वये कर सवलतीत बदल केला आहे. पाच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी कर सवलतीची मर्यादा २ हजार रुपयांवरून ५ हजार झाली आहे. याचाच अर्थ करदात्यांची ३ हजार रुपयांची जास्तीची बचत होईल. ज्येष्ठ नागरिकांनाही ही करसवलत लागू आहे. तथापि, सरसकट सर्व उत्पन्न गटांत ही सवलत लागू नाही; तसेच वयोमानपरत्वेही तरतुदींत फरक पडेल. ज्येष्ठ नागरिकांत ६0 ते ८0 वर्षे वय असलेले आणि ८0 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले असे दोन गट आहेत. या वयोगटातील नागरिकांना ३ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. ३ लाख ते ५ लाख उत्पन्न असलेल्या ८0 वर्षांच्या आतील ज्येष्ठांना १0 टक्के आयकर लागतो. ८७ कलमान्वये त्यांना आता ५ हजार रुपयांपर्यंत कर सवलत मिळेल. ही मर्यादा आधी २ हजार रुपये होती. याचाच अर्थ या ज्येष्ठांची ३ हजार रुपयांपर्यंत जादा बचत होईल. ५ लाख ते १0 लाख आणि १0 लाख ते १ कोटी या दोन स्लॅबमध्ये उत्पन्न असलेल्या ८0 वर्षांच्या आतील ज्येष्ठांची कोणतीही बचत होणार नाही. त्यांना नियमाप्रमाणे अनुक्रमे २0 टक्के आणि ३0 टक्के आयकर भरावा लागेल. १ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ८0 वर्षांच्या आतील ज्येष्ठांना अतिरिक्त ३ टक्के अधिभार द्यावा लागेल. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा अधिभार यंदाच्या अर्थसंकल्पात लागू केला आहे. १ कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ज्येष्ठांना अधिभारासह ३३ टक्के आयकर लागेल.