शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनांवर कोट्यवधीचा खर्च तरी टँकर का? जलव्यवस्थापन समितीची सभा : जि.प.सदस्यांनी विचारला यांना जाब

By admin | Updated: June 2, 2016 22:20 IST

जळगाव : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेवर गावांमध्ये २ ते ३ कोटी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र तरीदेखील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा वेळेवर होत नसेल तर पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांच्या निधीच्या खर्चाला मान्यता कशासाठी द्यावी. शासनाच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेसाठी केलेला खर्च उपयोगात आला नाही का? किंवा या योजनांमध्ये गैरव्यवहार झाला आहे का? असा जाब जलव्यवस्थापन समितीच्या सभेत जि.प.सदस्य रमेश पाटील यांनी सीईओंना विचारला.

जळगाव : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेवर गावांमध्ये २ ते ३ कोटी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र तरीदेखील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा वेळेवर होत नसेल तर पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांच्या निधीच्या खर्चाला मान्यता कशासाठी द्यावी. शासनाच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेसाठी केलेला खर्च उपयोगात आला नाही का? किंवा या योजनांमध्ये गैरव्यवहार झाला आहे का? असा जाब जलव्यवस्थापन समितीच्या सभेत जि.प.सदस्य रमेश पाटील यांनी सीईओंना विचारला.
जलव्यवस्थापन समितीची सभा अध्यक्षा प्रयाग कोळी यांच्या अध्यक्षतेखाली सानेगुरुजी सभागृहात झाली. यावेळी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, कृषि सभापती मिना पाटील, समाज कल्याण सभापती दर्शना घोडेस्वार, सदस्य पूनम पाटील, डॉ.उध्दव पाटील, रुपाली चोपडे, सीईओ अस्तिककुमार पांडेय, ग्रा.पं विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी मीनल कुंटे, राजन पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. उध्दव पाटील यांनी नवीन पंपिग मशिन घेतल्या आहेत. पाणी पुरवठ्यासाठी वापरण्यात येणारे पाईप वारंवार फुटतात. त्यामुळे नवीन पाईप लाईनच्या निधीसाठी मागणी केली. यावेळी मागील सभेतील ठरावांवरील पूर्ततेचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व उपविभागीय कामकाजाचा, सामुदायिक पाणी पुरवठा योजनेतंर्गत वसुलीचा व खर्चाचा आढावा, जि.प.च्या लघुसिंचन विभाग व उपविभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अंतर्गत साठवण बंधारे, सिमेंट नाला बांधणे, पाझर तलाव दुरुस्ती, साठवण बंधारे दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर आयत्या वेळी येणार्‍या विषयांना मान्यता देण्यात आली. त्यात भडगाव तालुक्यातील बोरनार पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी ९ लाख ५४ हजार, पारोळा तालुक्यातील वंजारी बोदडे पाणी पुरवठा योजनेसाठी व पीव्हीसी पाईपलाईनसाठी ८ लाख ५२ हजार, अमळनेर तालुक्यातील जळोद येथील जलकुंभ व पीव्हीसी पाईपलाईन दुरुस्ती व देखभालसाठी १५ लाख ८१ हजार रुपये तर रावेर तालुक्यातील गहुखेडा व इतर पाच गावांच्या जलशुध्दीकरण दुरुस्तीच्या कामासाठी २२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला.
हगणदारीमुक्तीसाठी डॉ.व्ही.आर.पाटील यांनी दोन गावे घेतली.
प्रत्येक गाव हगणदारीमुक्त करण्याचे आवाहन सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावेळी केले.