भिगवण येथे अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत
By admin | Updated: July 18, 2015 01:12 IST
भिगवण : भिगवण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोंडीराम सदाशिव क्षीरसागर ज्युनिअर कॉलेज यांच्याकडून ११ वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
भिगवण येथे अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत
भिगवण : भिगवण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोंडीराम सदाशिव क्षीरसागर ज्युनिअर कॉलेज यांच्याकडून ११ वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.या वेळी संस्थेचे अध्यक्ष अजित क्षीरसागर म्हणाले, की आजच्या काळात चांगले चारित्र्य, वर्तन व कष्ट करण्याची तयारी अंगी असेल, तर विद्यार्थी नक्की यशस्वी होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे गुण अंगी बाळगून चिकाटीने प्रयत्न करावेत आणि यशाची पायरी चढावी. या वेळी ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते मांडली. प्रा. तुषार क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अभ्यासक्रमातील अडचणीबाबत योग्य माहिती पुरवली. या कार्यक्रमासाठी संजय भरणे, कुमार कांबळे, अक्षय मचाले, राजेंद्र भरणे तसेच प्रा. अविनाश गायकवाड उपस्थित होते. प्रास्ताविक सुनील लोंढे यांनी केले.