शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाचे जल्लोषात स्वागत

By admin | Updated: January 1, 2016 06:57 IST

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघी तरुणाई सरसावल्याचे चित्र दिसून आले. सायंकाळपासून सुरू झालेला नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १ -  नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघी तरुणाई सरसावल्याचे चित्र दिसून आले. सायंकाळपासून सुरू झालेला नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष रात्री उशिरापर्यंत सुरू होता. रात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याने आसमंत उजळून गेला.

मुंबईत सीएसटी, नरीमन पाईंन्ट, सी फेस या ठिकाणी घोळक्या घोळक्याने तरुण-तरुणी कल्ला करीत, एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत गळाभेट घेत होते. हृदयाचे आकार असलेले रंगीबेरंगी फुगे, फुले, तसेच शोभेच्या वस्तूंनी रस्ते फुललेले होते. आकर्षक टोप्या, रंगीबेरंगी गॉगल्स घालून सेल्फीही काढून घेत होते. हॉटेल्समध्येही तरुणांनी गर्दी केली होती. तरुणांप्रमाणोच तरुणीही ग्रुप-ग्रुपने फिरत जल्लोष करीत होत्या. रस्त्यावरील विविध खाद्यपदार्थाचा स्वाद घेत तरुणाईने जल्लोष केला. शहरात सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची धूम सुरू असताना शहर आणि सोसायटय़ांमध्येही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, दिल्ली, गोवा, पुणे या ठिकाणांसह देशात सर्वत्र नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. 

न्युझीलंड, दुबई, ऑस्ट्रेलिया या ठिकाणीही मोठ्या उत्साहाच फटाक्यांची आतषबाजी करत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आलेे. मात्र,  दुबईतील जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफा इमारतीजवळील एका हॉटेलला नवीन वर्षाचे स्वागत करताना गुरुवारी रात्री आग भीषण आग लागल्याची  दुर्घटना घडली. या दुर्घटनेत हॉटेलचे मोठे नुकसान झाले असून १४ जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.