शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

सिमकार्डप्रमाणे Jio DTH लाही वेलकम ऑफर !

By admin | Updated: April 5, 2017 17:19 IST

जिओ सिमकार्डप्रमाणे सेट टॉप बॉक्ससाठीही कंपनीकडून वेलकम ऑफर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - भारतीय दूरसंचार क्षेत्रात धमाल उडवून दिल्यानंतर रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करण्यास सज्ज आहे.  कंपनी आता  DTH सर्विस सुरू करणार असून या महिन्यातच सेट टॉप बॉक्स लॉन्च करणार असल्याचं वृत्त आहे. 
 
सिमकार्डप्रमाणे सेट टॉप बॉक्ससाठीही कंपनीकडून वेलकम ऑफर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.  वेलकम ऑफरमध्ये प्रमोशन करण्यासाठी कंपनी 90 दिवस सर्विस फ्री देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ग्राहकांना सर्विस आवडल्यानंतरच त्यांच्याकडून पैसे आकारले जातील असं म्हटलं जात आहे. जिओ आपल्या  DTH सर्विससाठी महिन्याला 180 ते 200 रूपये आकारण्याची शक्यता आहे. यामध्ये 50 HD चॅनलसह 300 चॅनल पाहता येतील अशी माहिती आहे.  
 
यापुर्वीही जिओ सेट टॉप बॉक्स लॉन्च करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आता लीक झालेल्या फोटोंमुळे जिओच्या DTH सर्विसबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे.  जिओ IP  आधारित टीव्ही सर्विस सुरू कऱणार असल्याचं बोललं जात आहे. फोटोमध्ये दिसत असलेल्या सेट टॉप बॉक्सच्या रिमोटमध्ये माईकचं बटन दिसत आहे त्यामुळे यामध्ये व्हॉइस कमांड देण्याचा पर्याय असण्याची शक्यता आहे.
 
 
जिओ टीव्ही रिलायन्स जिओ फायबरवर काम करेल असं वृत्त आहे. सेट टॉप बॉक्समध्ये एचडीएमआय पोर्ट, लॅन पोर्ट आणि युएसबी पोर्ट दिसत आहे, पण विशेष म्हणजे यामध्ये RJ-45 पोर्टही आहे. म्हणजे सेट टॉप बॉक्सला हाय स्पीड ब्रॉड बॅंडसोबत कनेक्ट करता येणार आहे. मात्र, याबाबत कंपनीकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.