शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

आपमध्ये साठमारी विकोपाला

By admin | Updated: June 7, 2014 02:31 IST

पराभवानंतर प्रथमच आम आदमी पार्टीच्या (आप) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असताना पहिल्या फळीतील नेत्यांची भांडणे चव्हाट्यावर येत आहेत.

केजरीवालांनाही विरोध : सिसोदिया- योगेंद्र यादव यांची एकमेकांवर आगपाखडफराज अहमद/ नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच आम आदमी पार्टीच्या (आप) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असताना पहिल्या फळीतील नेत्यांची भांडणे चव्हाट्यावर येत आहेत. खुद्द अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वालाही विरोध होत आहे.मनीष सिसोदिया आणि योगेंद्र यादव यांनी शुक्रवारी परस्परांवर तोफ डागत संघर्षाची ठिणगी उडविली. यादव यांनी आपची राजकीय व्यवहार समिती आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिला असून त्यांनी केजरीवाल हे नेते नव्हे तर, पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून वागत असल्याचा आरोप एका पत्रात केला आहे. दुसरीकडे सिसोदिया यांनी पत्रात यादव हे हरियाणातील आपचे नेते नवीन जयहिंद यांच्यासोबतच्या संघर्षातून पक्षनेतृत्वाला या वादात ओढत असल्याचा आरोप केला.देशभरात लढायचे नव्हतेलोकसभा निवडणुकीत देशभरात एवढ्या मोठ्या जागा लढविण्याला केजरीवाल यांचा ठाम नकार होता. काही वर्षे दिल्लीतील राजकारणावरच लक्ष केंद्रित करण्याची त्यांची इच्छा होती. योगेंद्र यादव आणि अन्य काही नेत्यांनी देशभरात लढण्यासाठी भाग पाडले. निकाल सर्वांसमोरच आहे, असेही सिसोदिया म्हणाले.यादव हे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहात नसून त्याऐवजी ई-मेल पाठवत आहेत. या ई-मेलद्वारे त्यांना काय साध्य करायचे आहे. तुम्हाला पक्ष संपवायचा आहे काय? जयहिंद यांच्यासोबतच्या भांडणात तुम्हाला केजरीवालांना संपवायचे आहे काय? असा सवाल सिसोदिया यांनी केला आहे.दमानियाही नाराजअंजली दमानिया यांनी पक्षातील कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत राजीनामा दिला होता. आपच्या संसदीय व्यवहार समितीच्या सदस्य शाझिया इल्मी यांनी अलीकडेच केजरीवालांवर तोफ डागत राजीनामा दिला आहे. दमानिया यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त धडकले असतानाच त्यांची समजूत घालण्यात आली. त्यांच्यावर आता इल्मींचे मन वळविण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते.अमेठीत राहुल गांधींविरुद्ध निवडणूक लढवणारे कुमार विश्वास यांनी पक्ष कार्यकारिणीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त होते, मात्र आपचे प्रवक्ते नागेंद्र शर्मा यांनी त्याचा इन्कार केला.