शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

समान नागरी कायद्यासाठी आम्ही आदेश देणार नाही

By admin | Updated: December 8, 2015 02:03 IST

देशातील सर्व धर्मांच्या नागरिकांसाठी समान नागरी संहिता लागू करायची की नाही या विषय पूर्णपणे संसदेच्या अखत्यारीतील असल्याने आम्ही असा कायदा करण्याचा आदेश संसदेला देऊ शकत नाही व देणारही नाही

नवी दिल्ली : देशातील सर्व धर्मांच्या नागरिकांसाठी समान नागरी संहिता लागू करायची की नाही या विषय पूर्णपणे संसदेच्या अखत्यारीतील असल्याने आम्ही असा कायदा करण्याचा आदेश संसदेला देऊ शकत नाही व देणारही नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.संसदेला समान नागरी कायद्यासाठी आदेश द्यावा, यासाठी भाजपा नेते व वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी जनहित याचिका केली होती. सरन्यायाधीश न्या. तीर्थ सिंग ठाकूर, न्या. ए. के. सिक्री व न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे नकार देत उपाध्याय यांना याचिका मागे घ्यायला लावली.समान नागरी कायद्याच्या विषयात हस्तक्षेप करण्यास या न्यायालयाने २१ वर्षांपूर्वी नकार दिलेला आहे व त्यानंतर परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही, असे खंडपीठाने म्हटले.याचिकेवर सुनावणी घेण्याचा आग्रह अर्जदारांचे ज्येष्ठ वकील गोपाळ सुब्रह्मण्यम करत राहिले तेव्हा खंडपीठाने त्यांना सांगितले की, सरकारने समान नागरी कायद्यासाठी प्रयत्न करावा, हे उद्दिष्ट राज्यघटनेत अंतर्भूत केले जाणे आणि एखाद्या जनहित याचिकेवर आम्ही संसदेला तसा आदेश देणे या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. न्यायमूर्ती म्हणाले, जे थेटपणे करता येत नाही ते तुम्ही आम्हाला अप्रत्यक्ष मार्गाने करायला सांगत आहात.... समान नागरी संहिता लागू करा, असे आम्ही संसदेस सांगू शकत नाही....आधी आम्हाला असे सांंगा की समान नागरी कायदा नसल्याने ज्यांच्यावर अन्याय होतो, असे तुम्ही म्हणता त्या समाजातील कोणी तक्रार घेऊन आले आहे का? पक्षपात आणि अन्यायाीच तक्रार घेऊन एखादी मुस्लिम व्यक्ती आली असती तरी एखाद वेळेस आम्ही त्यावर विचार केला असता.नव्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने अशा प्रकारे ठाम नकार दिला असला तरी समान नागरी कायद्याचा विषय न्यायालयाने कशा प्रकारे हाताळावा यावर विविध न्यायाधीशांमध्ये निदान वैचारिक पातळीवर तरी मतभिन्नता असल्याचे जाणवते. कारण दोनच महिन्यांपूर्वी न्या. अनिल दवे व न्या. आदर्श कुमार गोयल यांच्या खंडपीठाने मुस्लिमांचे व्यक्तिगत कायदे समानतेच्या मुलभूत हक्कांची पायमल्ली करणारे आहेत का, हा विषय सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका म्हणून हाती घेऊन त्याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावावा, असे निर्देश एका निकालपत्रात दिले होते.