शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

आम्हीच पठाणकोट हल्ला केला

By admin | Updated: January 22, 2016 02:48 IST

पठाणकोट हल्ला हा आमच्या कारवायांचा भाग असल्याचे सांगत हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याने या हल्ल्याची जबाबदारी जाहीरपणे स्वीकारली आहे

नवी दिल्ली : पठाणकोट हल्ला हा आमच्या कारवायांचा भाग असल्याचे सांगत हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याने या हल्ल्याची जबाबदारी जाहीरपणे स्वीकारली आहे. ज्याचा खून झाला तो बळी आणि मारेकऱ्याचा मित्र अशा दोघांचे वकीलपत्र तुम्ही एकाचवेळी घेऊ शकत नाही, असे सांगत त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या मुलाखतीची टर उडविली. शरीफ यांनी पाकिस्तानी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत दहशतवादावर टीका केली होती. सलाहुद्दीनने भारत-पाक चर्चेशी काहीही देणे-घेणे नसल्याचे सांगत या हल्ल्याचा संबंध जोडू नये असेही स्पष्ट केले आहे.आम्ही भारताच्या लष्करी संस्थांना लक्ष्य बनविले असून पठाणकोट हल्ला हा या कारवाया सुरू ठेवण्याचाच एक भाग आहे, असे सलाहुद्दीन याने पाकिस्तानातील ‘वजूद’ या उर्दू न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. > काश्मीर वादात पाकिस्तान हा मूळ पक्ष... 1 पाकिस्तान हा काश्मीर मुद्यात मूळ पक्ष असल्याचे सलाहुद्दीन याने शरीफ यांच्या काश्मीर धोरणाविरोधात भूमिका मांडताना स्पष्ट केले आहे. काश्मीरमधील दबलेल्या घटकांच्या भावना आणि आकांक्षा पाहता पाकिस्तान हा जबाबदार घटक ठरतो. 2 तुम्ही बळी गेला त्याची आणि खुन्याच्या मित्राची वकिली एकाचवेळी करू शकत नाही. भारत-पाक चर्चा बंद पाडण्यासाठी पठाणकोट हल्ल्याचा कट रचण्यात आला हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. चर्चेच्या दीडशे फेऱ्या वांझोट्या ठरल्या आहेत, असे तो म्हणाला. > सीमेवर घुसखोराचा खात्मागुरुदासपूर (पंजाब) : सीमा सुरक्षा दलाने गुरुवारी सकाळी पठाणकोटमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर एका ३० वर्षीय घुसखोराचा खात्मा केला. २ जानेवारीला हवाईदल तळावरील हल्ल्यापासून बीएसएफ अतिसतर्क आहे.आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात बीएसएफच्या चमूला सकाळी ६ वाजताच्या दरम्यान बामियालच्या ताश परिसराजवळ किमान तीन घुसखोरांच्या संशयित हालचाली दिसल्या. त्यांना रोखण्याकरिता गोळीबार करण्यात आला. या कारवाईत एक घुसखोर ठार झाला तर त्याचे सहकारी पळून गेले.