शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

5 हजार वर्षांपासून पर्यावरणाचं रक्षण करत आहोत, मोदींचं ट्रम्प यांना उत्तर

By admin | Updated: June 2, 2017 19:56 IST

पॅरिस हवामान करारातून अमेरिकेने माघार घेतल्यानंतर भारत आणि चीनवर टीका करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

ऑनलाइन लोकमत
सेंट पीटर्सबर्ग, दि. 2 - जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषण कमी करण्याच्या दुष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पॅरिस हवामान करारातून अमेरिकेने माघार घेतल्यानंतर भारत आणि चीनवर टीका करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. 
 
सेंट पीटर्सबर्ग इकोनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकीकडे गुंतवणूकदारांना आमंत्रण दिलं तर दुसरीकडे भारत पर्यावरण स्नेही असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, भारत देश प्राचीन काळापासूनच याची जबाबदारी पार पाडत आला आहे. यासंदर्भातील त्यांनी दोन उदाहरणं दिली.  
 
मोदी यांनी सांगितले की, भारताला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.  5 हजार वर्ष जुनी शास्त्रं आमच्याकडे उपलब्ध आहेत, जे वेद या नावानं ओळखले जातात. यातील एक वेद म्हणजे अथर्ववेद जे पूर्णतः निसर्गाला समर्पित आहे. आम्ही त्या आदर्शांना पुढे घेऊन जात आहोत. निसर्गाचं शोषण करणं आम्ही गुन्हा मानतो. आम्ही निसर्गाचं शोषण स्वीकारत नाही.  यासाठी आम्ही आमच्या ""उत्पादन क्षेत्रात शून्य दोष, शून्य परिणाम"" या तत्त्वावर चालतो.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस हवामान कराराचा उल्लेख करत सांगितले की, आम्ही पर्यावरणीय संरक्षणासाठी एका जबाबदार देशासोबत पुढे जात आहोत.  मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो आणि काही वर्षांपूर्वी जगात गुजरातमधील सरकार असे होते की त्यांनी स्वतंत्र हवामान विभाग स्थापन केले होते. यासाठी एलईडी बल्बद्वलारे ऊर्जेची बचत केली जात होती. 40 कोटी एलईडी बल्ब घराघरात पोहोचवले आहेत. हजारो मेगावॅट वीज वाचवण्यात आली आहे. 
 
पॅरिस हवामान करारातून बाहेर पडल्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात मोर्चा उघडला आहे.  पॅरिस हवामान करार भारत-चीनसाठी फायदेशीर असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.  भारत या करारांतर्गत विकसित देशांमधून अब्जो-अब्जो रुपयांची परदेशी मदत मिळवत आहे, असेही ट्रम्प म्हणालेत.
 
मोदी यांनी  रशियातील गुंतवणूकदारांना आमंत्रण देते सांगितले की, 3 दशकांनंतर भारतात पूर्ण बहुमताचं सरकार निवडून आलं आहे. यामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगतीशील विचारांसोबत निर्णय घेण्याच्या दिशेनं आम्ही गतीनं पुढे वाटचाल करत आहोत. आज भारताचा जीडीपी 7 टक्क्यांच्या गतीनं वाढत आहे. 
 
पंतप्रधान मोदींनी रशियातील गुंतवणूकदारांना देशातील सुधारणांसंदर्भात आणि विशेषतः जीएसटीचा प्रामुख्यानं उल्लेख केला. सुरुवातीला आमच्याकडे प्रत्येक राज्यात वेगवेगळे कर कायदे होते. पण आता जीएसटीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. देशातील प्रत्येक कोप-यात आता समान कर कायदा लागू होणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी जनधन अकाउंट, आधार कार्ड आणि मोबाइल पेमेंट प्रणालीबाबतही माहिती दिली.