शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सासवड नगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा सुरळीत

By admin | Updated: June 8, 2016 01:50 IST

सासवड : सासवड शहराला सध्या फक्त वीर धरण योजनेतून पाणीपुरवठा होत आहे; परंतु गेले ४ ते ५ दिवस वीर धरण व कांबळवाडी परिसरातील वीजपुरवठा वादळ व पाऊस यामुळे खंडित झाला, त्यामुळे सासवड शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सातारा जिल्हा व पुरंदर तालुक्यामधील महावितरणच्या अधिकार्‍यांनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर केल्याने आता पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी दिली.

सासवड : सासवड शहराला सध्या फक्त वीर धरण योजनेतून पाणीपुरवठा होत आहे; परंतु गेले ४ ते ५ दिवस वीर धरण व कांबळवाडी परिसरातील वीजपुरवठा वादळ व पाऊस यामुळे खंडित झाला, त्यामुळे सासवड शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सातारा जिल्हा व पुरंदर तालुक्यामधील महावितरणच्या अधिकार्‍यांनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर केल्याने आता पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी दिली.
सासवडचा पाणीपुरवठा विजेअभावी बंद झाल्यावर, नगराध्यक्षांनी संपर्क साधला, अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरित कामे करून वीजपुरवठा सुरू केला. रविवार, दि. ५ जून, दुपारी १ पासून पाणीपुरवठा सुरू झाला व सोमवारपासून पाणी शहरास मिळू लागले.
ज्या नागरिकांना पाणी मिळाले नाही, त्यांना पाणी द्यावे, असे आवाहन सासवडमधील टँकरमालकांना करण्यात आले. त्यास प्रतिसाद देऊन सासवडमधील प्रमोद बोरावके, वसंत बोरावके, संतोष जगताप, नितीन भोंगळे, विलास गिरमे, पुरंदर मिल्क प्रोडक्ट यांनी पाण्यासह टँंकर दिले. ते पाणी नागरिकांना देण्यात आले. यापुढे गरज भासल्यास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. नगरपालिकेने त्यांचे आभार मानले.
दरम्यान, सासवड शहराला या टंचाईकाळात घोरवडी धरणातून पाणी द्यावे, असे आवाहन नगराध्यक्षा यांनी दूरध्वनीवरून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना केले. त्यास प्रतिसाद मिळाला नाही, असेही नगराध्यक्षा यांनी सांगितले . सासवडच्या पाणी पुरवठ्याबाबत नगरपालिका दवंडीद्वारे नागरिकांना माहिती देत असते. वस्तुस्थिती माहिती झाल्याने नागरिकही तक्रार न करता सहकार्य करतात, असे नगराध्यक्ष म्हणाल्या. पाणीटंचाई काळात महावितरणचे अधिकारी, सासवड नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस काम करून पाणीपुरवठा करतात. त्यांना नगर पालिकेने धन्यवाद दिले आहेत.