शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

३२ गावांना टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: March 13, 2016 00:05 IST

श्री.बोरसे साहेब यांच्याकडे द्यावे

श्री.बोरसे साहेब यांच्याकडे द्यावे

जळगाव : जिल्‘ात टंचाईच्या झळा तीव्र होत असून टंचाईग्रस्त गावे व टँकरचीसोबतच विहीर अधिग्रहन, विंधन विहिरींची संख्या वाढत आहे.
अत्यल्प पावसामुळे जिल्‘ात डिसेंबर महिन्यापासून टंचाईची स्थिती भासत आहे. जिल्‘ातील २३ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. त्यात जळगाव तालुक्यात एक, जामनेर तालुक्यातील आठ गावात, चाळीसगाव तालुक्यात एक, अमळनेर तालुक्यात पाच गावांमध्ये तर पारोळा तालुक्यातील आठ गावांचा समावेश होता. शासकीय दहा व खाजगी पाच टँकरच्या मदतीने हा पाणीपुरवठा होत होता. यामध्ये पारोळा तालुक्यातील हनुमंतखेडा व भडगाव तालुक्यातील वडगाव बुद्रुक या दोन गावांमध्ये टँकरसाठीचा प्रस्ताव आला आहे. त्यानुसार या दोन्ही गावांसह चाळीसगाव तालुक्यातही एका टँकरला मंजुरी देण्यात आली असून सोबतच अमळनेर तालुक्यातील आणखी सहा गावांच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता ३२ गावांमध्ये २४ टँकरने पाणीपुरवठा होणार आहे. यात शासकीय १० तर खाजगी १४ टँकरचा समावेश आहे.
विहीर अधिग्रहणही वाढले...
जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी आतापर्यंत विहीर अधिग्रहण केलेल्या गावांची संख्या आता ९९ वरुन १३८ झाली आहे.
विंधन विहिरींचीही संख्या वाढली...
जळगाव व बोदवड तालुक्यातील १४ गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे बोदवड तालुक्यातील चिखली, शेवगे, मनूर बुद्रुक, मनूर खुर्द, बोरगाव, लोणवाडी तर जळगाव तालुक्यातील नशिराबाद, धानवड, धानवड तांडा, बिलवाडी, वसंतवाडी, सुरेशदादा जैन नगर, शिरसोली प्र.न., शिरसोली प्र.बो. यासह २२ गावांमधून प्रस्ताव होते. २ मार्च पर्यंत जिल्‘ातील १५८ गावांमधील ३५८ नवीन विंधन विहीर घेण्यात आल्या होत्या. त्यात आणखी भर पडली आहे. आता १८३ गावांमध्ये ४२० विंधन विहीर घेण्यात आल्या आहेत.