शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद; घरांच्या नेमप्लेटवर मुलींचे नाव!

By admin | Updated: July 30, 2016 02:18 IST

घराचा उंबरठा ओलांडून तिने अनेक क्षेत्र पादाक्रांत केली. या घटनांनाही एव्हाना बराच काळ लोटला आहे. पण, चौकटीबाहेरच्या या स्त्रीला खरोखरच आजही प्रतिष्ठा मान, सन्मान मिळतो का?

रायपूर : घराचा उंबरठा ओलांडून तिने अनेक क्षेत्र पादाक्रांत केली. या घटनांनाही एव्हाना बराच काळ लोटला आहे. पण, चौकटीबाहेरच्या या स्त्रीला खरोखरच आजही प्रतिष्ठा मान, सन्मान मिळतो का?. अनेकांना आत्मपरिक्षण करायला लावणारा हा प्रश्न असला तरी त्याचे काही प्रमाणात उत्तर देण्याचा प्रयत्न छत्तीसगढच्या बालोद जिल्ह्यातील ग्रामस्थांनी केला आहे. घरांच्या नेमप्लेटवर मुलींचे नाव टाकत त्यांनी मुलींच्या अस्तित्वाला नवे परिमाण दिले आहे. तर पितृसत्ताक कुटुंब पद्धतीत वाढलेल्या या समाजाने परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले हे नवे पाउलही समजले जात आहे. समाजात आणि शैक्षणिक वर्तुळात मुलींची ओळख सशक्त व्हावी, हा यामागचा हेतू आहे. स्थानिक प्रशासनाच्या योजनेंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. माओवाद्यांचा काही प्रमाणात प्रभाव असलेल्या बालोद जिल्ह्यात दीड महिन्यापूर्वी या योजनेची सुरुवात झाली. बालोदचे जिल्हाधिकारी राजेश सिंह राणा यांनी सांगितले की, समाजात मुलींचे महत्व वाढण्यासाठी आणि मुलींचे साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. बालोद जिल्ह्यातील अनेक गावात आतापर्यंत २,७०० घरांवर मुलींच्या नेमप्लेट लागल्या गेल्या आहेत. स्थानिक प्रतिनिधी, सरपंच आणि अधिकारी यांच्यात विचार विमर्श झाल्यानंतर पंतप्रधानांची बेटी बचाव, बेटी पढाव ही मोहिम राबविण्यात येत आहे. १२ ग्रामपंचायतींकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (वृत्तसंस्था)संपूर्ण राज्यात राबविली जावी मोहीम- एका गावातील अकरावीतील विद्यार्थीनी पेमिना साहू हिने सांगितले की, आमच्यासाठी एक स्वप्न साकार झाल्यासारखे आहे. या योजनेमुळे मुलींच्याबाबत गावातील लोकांची विचारपद्धती बदलत असल्याचे दिसून येत आहे. अन्य एक विद्यार्थीनी जागृति टेकम म्हणाली की, ही मोहीम पूर्ण राज्यात राबविली जावी. दरम्यान, पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी या नेमप्लेट हिरव्या रंगातील आहेत तर पांढऱ्या रंगाने यावर नाव लिहिले आहे. तथापि, या योजनेचा शासकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून विस्तार करण्याचा विचार सुरु आहे.