शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कामतांना सोनियांच्या भेटीची प्रतीक्षा कायम

By admin | Updated: June 10, 2016 04:44 IST

कामत यांनी राजकीय संन्यासाचा निर्णय परत घेण्याचे संकेत दिले असले तरी त्याबाबत गुरुवारीही संभ्रम कायम राहिला

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी राजकीय संन्यासाचा निर्णय परत घेण्याचे संकेत दिले असले तरी त्याबाबत गुरुवारीही संभ्रम कायम राहिला. कामत यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल आणि ज्येष्ठ नेते ए.के. अ‍ॅन्टनी यांची स्वतंत्ररीत्या भेट घेतली. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याशी संवादातूनच काहीतरी ठोस निष्पन्न होईल, असे तर्कवितर्क दिवसभर सुरू होते. रात्री उशिरापर्यंत सोनिया गांधी व कामत यांच्यात चर्चा होऊ शकली नाही.वरिष्ठ नेत्यांचा भर कामत यांना काय हवे हे जाणून घेण्यावर असेल. त्यांच्या राजकीय संन्यासाचा निर्णय कसा बदलता येईल यावर चर्चा झाल्यानंतर कामत पक्षाध्यक्षांना भेटतील असे संकेत १० जनपथहून मिळाले होते. गुरुवारी कामत यांनी ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या सल्ल्याबाबत कामत यांनी अद्याप निर्णय घोषित केलेला नाही. त्यामुळे या चर्चेतून कोणतीही ठोस निष्पत्ती समोर आलेली नाही. कामत यांनी अ‍ॅन्टनी आणि अहमद पटेलशी चर्चा केल्यानंतर सकारात्मक संकेत मिळाल्याला सुशीलकुमार शिंदे यांनी दुजोरा दिला होता. कामत यांची नाराजी लवकरच दूर केली जाईल, असे ते म्हणाले. सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे काय मत आहे ते स्पष्ट व्हायला हवे. कारण अंतिम निर्णय तेच घेतील, असे कामत यांनी ज्येष्ठ नेत्यांसोबत झालेल्या चर्चेत नमूद केल्याचे कळते.>निरुपम यांच्या कार्यशैलीवर नाराज.....प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बनताच संजय निरुपम यांनी कामत आणि अन्य काही नेत्यांना अडगळीत टाकले आहे. निरुपम यांना पदावरून हटवावे ही कामत यांची मागणी असली तरी निरुपम यांना न हटवताच कामत यांची नाराजी दूर करण्याचा मधला मार्ग शोधण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालविला आहे. यावर कामत यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही. अन्य नेत्यांनीही बोलणे टाळले. आहे.