शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

व्होडाफोनची जबरदस्त ऑफर, अवघ्या 19 रुपयांत अनलिमिटेड फ्री कॉलिंग

By admin | Updated: May 25, 2017 17:33 IST

व्होडाफोननं जबरदस्त ऑफर ग्राहकांसाठी बाजारात आणल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25 - व्होडाफोननं जबरदस्त ऑफर ग्राहकांसाठी बाजारात आणल्या आहेत. जिओचा धसका घेत व्होडाफोननंही अवघ्या 19 रुपयांत अनलिमिटेड मोफत कॉलिंगचा एक प्लॅन आणला आहे. या प्लॅनअंतर्गत दरदिवशी 4G स्पीडचा 100 एमबी डेटा मिळणार आहे. सुपर डे या नावाच्या या प्लॅनवर ग्राहकांच्या नक्कीच उड्या पडणार आहेत. व्होडाफोननं सुपर डेनंतर आणखीही दोन प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत.
पहिला 19 रुपयांचा प्लॅन हा एका दिवसापुरता मर्यादित आहे. तर दुसरा आणि तिसरा प्लॉन अनुक्रमे 49 आणि 89 रुपयांचा आहे. या ऑफरचं नाव सुपर वीक असून, याची वैधता आठवड्याभराची आहे. एक दिवसाच्या 19 रुपयांच्या रिचार्जवर व्होडाफोन टू व्होडाफोन लोकल आणि एसटीडी कॉलिंग अनलिमिटेड आहे. यासोबत 100 जीबी 4G डेटाही फ्री मिळणार आहे. ही ऑफर 4जी हँडसेट वापरकर्त्यांसाठी आहे. 49 रुपयांच्या पॅकची वैधता 7 दिवसांची आहे. यात तुम्हाला 7 दिवसांपर्यंत व्होडाफोन टू व्होडाफोन लोकल आणि एसटीडी कॉलिंग अनलिमिटेड मोफत मिळणार आहे. तसेच याबरोबरच दिवसाला तुम्हाला 250 एमबी 4जी डेटा फ्री मिळणार आहे. तर 89 रुपयांच्या ऑफरची वैधताही 7 दिवसांचीच आहे. (जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि व्होडाफोनची हातमिळवणी)या ऑफर अंतर्गत व्होडाफोन टू व्होडाफोन लोकल आणि एसटीडी कॉलिंग अनलिमिटेड मोफत उपलब्ध आहे. यात 100 मिनिटांचा टॉकटाइमही देण्यात आला आहे. मात्र तो फक्त दुस-या नेटवर्कसाठी फायदेशीर ठरणार आहे. तसेच या ऑफरअंतर्गत 250 एमबी 4जी डेटा फ्री मिळणार आहे. या सर्व ऑफर तुम्ही व्होडाफोनची वेबसाइट आणि माय व्होडाफोन अॅप आणि रिटेल स्टोअरमधूनही मिळवू शकता. मात्र या सर्व ऑफर फक्त प्रीपेड यूझर्ससाठीच उपलब्ध आहेत. त्यामुळे पोस्टपेड प्लॅनसाठी व्होडाफोन काय ऑफर घेऊन येणार आहे, याची उत्कंठा लागून राहिली आहे.