शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळातील लघुग्रहाला विश्वनाथन आनंदचे नाव

By admin | Updated: April 3, 2015 12:17 IST

बुद्धिबळात भारताचा झेंडा रोवणारा विश्वनाथन आनंद यांची महती आता थेट अंतराळात पोहोचली असून मंगळ व गुरु या ग्रहांमध्ये आढळलेल्या एका लघुग्रहाचे 'विशी आनंद ४५३८' असे नाव ठेवण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत 
चेन्नई, दि. ३ - बुद्धिबळात भारताचा झेंडा रोवणारा विश्वनाथन आनंद यांची महती आता थेट अंतराळात पोहोचली आहे. अमेरिकेतील लघुग्रह केंद्राने मंगळ व गुरु या ग्रहांमध्ये आढळलेल्या एका लघुग्रहाचे 'विशी आनंद ४५३८' असे नामकरण केले आहे.  विश्वनाथन आनंदच्या या अंतराळ भरारीने भारतीय क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 
मंगळ व गुरु या ग्रहांमध्ये १० ऑक्टोबर १९८८ मध्ये एक लघुग्रह आढळला होता. जपानचे केन्झो सुझूकी यांनी या ग्रहाचा शोध लावला होता.  मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या लघुग्रहाला नाव देण्यात आले नव्हते. लघुग्रहांचा अभ्यास करणा-या अमेरिकेतील लघुग्रह केंद्राचे सदस्य मायकेल रुडेन्को हे स्वतः बुद्धिबळाचे चाहते असून या लघुग्रहाला विश्वनाथन आनंदचे नाव द्यावे असा प्रस्ताव रुडेन्को यांनी मांडला होता. या प्रस्तावाला अंतराळ संघटनेने मान्यता दिल्याने या लघुग्रहाचे नामकरण विशी आनंद ४५३८ असे करण्यात आले.  पाच वेळा जगज्जेतेपद पटकावणारा विश्वनाथन आनंद हा उत्तम बुद्धिबळपटू आहे. त्याचसोबत तो एक चांगला व्यक्ती असून अंतराळ क्षेत्राचीही त्याला आवड आहे. म्हणूनच या ग्रहाला मी त्याचे नाव देण्याची शिफारस केली असे रुडेन्को यांनी सांगितले. या सन्मानाविषयी विचारले असता विश्वनाथन आनंद हसतमुखाने म्हणतो, मी परग्रहावरुन आल्याचे माझी पत्नी मला चिडवते. आज यावर शिक्कामोर्तब झाले.
सुर्यमालेत साडे सहा लाखांहून अधिक लघुग्रह असून यातील अनेक लघुग्रहांना विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींची नावे देण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रात बुद्धिबळमधील माजी विजेता अनातोली कारपोव्ह, क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन, आर्सनलचे फुटबॉल प्रशिक्षक आर्सन वेन्गर, टेनिसपटू रॉजर फेडरर, राफेल नादाल यांची नावे लघुग्रहांना देण्यात आली आहे.