शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

पटेल आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण

By admin | Updated: April 18, 2016 02:40 IST

पटेल समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण देणे आणि अटकेत असलेल्या नेत्यांची तात्काळ सुटका करण्याच्या मागणीसाठी पटेल समाजाने रविवारी आयोजित केलेल्या विशाल रॅलीला

मेहसाणा : पटेल समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण देणे आणि अटकेत असलेल्या नेत्यांची तात्काळ सुटका करण्याच्या मागणीसाठी पटेल समाजाने रविवारी आयोजित केलेल्या विशाल रॅलीला हिंसक वळण मिळाले. आंदोलनकर्त्यांनी दोन इमारतींना आग लावली आणि पोलिसांच्या अनेक वाहनांची तोडफोड केली. यानंतर गुजरातच्या मेहसाणा येथे संचारबंदी लागू करण्यात येऊन मोबाईल इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली.‘सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत मेहसाणात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात मोबाईल इंटरनेट सेवाही बंद केली जाईल. हिंसक जमावाने दोन शासकीय इमारतींना आग लावली. दगडफेकीत उपविभागीय दंडाधिकारी आणि महसूल अधिकारी जखमी झाले,’ अशी माहिती मेहसाणाचे जिल्हाधिकारी लोचन सेहरा यांनी दिली.आंदोलकांनी भारतीय अन्न महामंडळाचे (एफसीआय) गोदाम आणि जिल्हा कार्यालय जाळले. यासंदर्भात १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या हिंसाचारात ५ पोलीस आणि २५ आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. मेहसाणातील घटनेचे पडसाद सुरत येथेही उमटले. रस्त्यावर उतरून निदर्शने करणाऱ्या पटेल समाजाच्या ४३५ लोकांना पोलिसांनी अटक केली. सुरत आणि राजकोट येथेही खबरदारीचा उपाय म्हणून मोबाईल इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)मेहसाणा येथे पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांवर लाठीहल्ला आणि अश्रुधुराचा वापर केला. सरदार पटेल ग्रुपने जेलभरो आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार हे आंदोलक मोधेरा चौकाजवळ मोठ्या संख्येत गोळा झाले होते. पोलीस कारवाईत सरदार पटेल ग्रुपचे नेते लालजी पटेल हेही जखमी झाले. दरम्यान, सरदार पटेल ग्रुप आणि हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलनाने आज सोमवारी गुजरात बंदचे आवाहन केले आहे.