शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

टिपू सुलतानच्या जयंतीवरून हिंसाचार

By admin | Updated: November 10, 2015 22:58 IST

अठराव्या शतकातील म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्या जयंती समारंभाच्या आयोजनावर मंगळवारी उसळलेल्या हिंसाचारात विश्व हिंदू परिषदेचा एक नेता ठार, तर पोलिसांसह अनेक जण जखमी झाले.

मादीकेरी (कर्नाटक) : अठराव्या शतकातील म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्या जयंती समारंभाच्या आयोजनावर मंगळवारी उसळलेल्या हिंसाचारात विश्व हिंदू परिषदेचा एक नेता ठार, तर पोलिसांसह अनेक जण जखमी झाले.येथून जवळच असलेल्या कोडागू जिल्ह्यातील एका भागात अज्ञात लोकांनी केलेल्या गोळीबारात एक युवकही जखमी झाला. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी अतिरिक्त पोलीस कुमक पाठविण्यात आली आहे.जयंती कार्यक्रमाचे समर्थक आणि विरोधकांमध्ये संघर्ष पेटल्याने शेकडो लोकांना पांगविण्याकरिता पोलिसांना लाठीमारासोबतच अश्रुधूर सोडावा लागला. यावेळी झालेल्या दगडफेकीत विहिंपचे नेते कुटप्पा डोक्याला दगड लागल्याने जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. राज्य शासनातर्फे प्रथमच टिपू सुलतान जयंती साजरी करण्यासाठी राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना हा हिंसाचार भडकला आहे. काही संघटना टिपूला धर्मांध मानत असल्याने भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध या संघटनांनी कोडागू जिल्ह्यात मंगळवारी बंदचे आवाहन केले होते. दरम्यान, गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी सांगितले की, चामराजनगर आणि म्हैसूर जिल्ह्यातून मादीकेरीला अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)