हणखणे : राज्य शासनाने घोषणा केलेला एक कोटीच्या निधीतून बांधण्यात येणार्या बहुउद्देशीय प्रकल्पास ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. प्रकल्पाच्या जागेसंबंधी ग्रामस्थांना विश्वासात न घेताच जागा निश्चित करून संपादन प्रक्रियाही सुरू केल्याने ग्रामस्थांनी आक्षेप घेत त्याबाबतचा ठराव रविवारी झालेल्या वारखंड-नागझर ग्रामसभेत फेटाळून लावला.एक कोटी रूपयातून वरील पंचायत क्षेत्रात बहुउद्देशीय प्रकल्प बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार जागा निित केल्यावर त्याला शासनाची मान्यता मिळाल्यावर निधी मंजूर हेाणार आहे. प्रकल्प बांधण्यासाठी पंचायतीने येथील ग्रामस्थ आणि जमीन मालकांना विश्वासात न घेताच शेत जमीन निित करून पुढील कार्यवाही सुरू केली. दरम्यान रविवारच्या ग्रामसभेत याबाबतचा प्रश्न ज्ञानेश्वर परब यांनी उपस्थित करून याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जमीन निित केल्याचे सरपंच संजय तुळस्कर यांनी ग्रामस्थांना सांगताच त्यांना आर्य वाटले.निित केलेली जागा शेत जमिनीत असून तेथे तिळारी कालव्याअंतर्गत नवीन जलवाहिनी घालण्याचे काम चालू आहे. असे असताना तेथे प्रकल्प उभारण्यास ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. विशेष म्हणजे जमीन मालकाला विश्वासात न घेताच ही जागा कोणी निित केली असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारताच पंचायत मंडळाने मासिक बैठकीत हा निर्णय घाल्याचे सरपंच तुळस्कर यांनी सांगितले. मात्र यावर समाधानी न झालेल्या ग्रामस्थांनी गावातील कचरा प्रकल्पासाठी जागा उपलब्ध होत नाही आणि एक कोटीच्या भव्य प्रकल्पासाठी जागा कशी काय उपलब्ध असा सवाल करत सरपंचास कोंडीत पकडले. यावर बराचवेळ चर्चा झाल्यावर ही जमीन घेण्यास सक्त विरोध करून त्याबाबतचा ठराव ग्रामस्थांनी धुडकावला. (प्रतिनिधी)
बहुउद्देशीय प्रकल्पासाठी निित केलेल्या जमिनीस ग्रामस्थांचा आक्षेप
By admin | Updated: June 10, 2014 01:49 IST