शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

विजय मल्ल्यांचे बॉलीवूड कनेक्शन

By admin | Updated: March 13, 2016 02:07 IST

देशाच्या वेगवेगळ्या १७ बॅँकांकडून ९ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज न फेडता गुपचूप देश सोडून लंडनला गेलेले व्यावसायिक विजय मल्ल्या मीडियामध्ये सध्या चर्चेत आहेत.

- anuj.alankar@lokmat.comदेशाच्या वेगवेगळ्या १७ बॅँकांकडून ९ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज न फेडता गुपचूप देश सोडून लंडनला गेलेले व्यावसायिक विजय मल्ल्या मीडियामध्ये सध्या चर्चेत आहेत. विजय मल्ल्याचे चर्चेत असण्याचे एक कारण त्यांचे उच्च राहणीमानदेखील आहे. बॉलिवूडच्या झगमगत्या जगाशीही त्यांनी कायम विशेष संबंध जपले आहेत. कधी पडद्याच्या मागे राहून चित्रपट बनविण्यावरुन, तर कधी चित्रपट सुंदरींसोबत डेटिंगवरून त्यांचे किस्से गाजत राहिले. विजय मल्ल्याचे बॉलिवूडशी असलेले दोन कनेक्शन जास्त चर्चेत राहिले आहेत. पहिले कनेक्शन किंग फिशरचे कॅलेंडर. ज्यात देश-विदेशातून निवडक सुंदरी स्टारडम सारखा रुबाब मिळवायच्या. या सर्वांमागे मल्ल्याच होते. प्रत्येक वर्षी किंग फिशर कॅलेंडरच्या लॉँचिंग समारोहात सहभागी होण्यासाठी बॉलिवूडच्या सिताऱ्यांमध्ये मोठी चढाओढ असायची. या समारोहात फॅशन आणि बॉलिवूडचे दिग्गज नेहमी दिसायचे. विजय मल्ल्याचे दुसरे कनेक्शन आईपीएलमध्ये त्यांची टीम जी बेंगळूरूची होती. मल्ल्यांच्या टीमसाठी क धी कॅटरिना कैफ ब्रँड अँबेसीडर बनली, तर कधी दीपिका पादुकोण. दीपिकाचे मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ सोबतदेखील जवळचे नाते होते. मधूर भांडारकरने जेव्हा ‘कॅलेंडर गर्ल’ चित्रपट बनविला तेव्हा त्याची विजय मल्ल्याच्या जीवनाशी तुलना करण्यात आली. यात एक रहस्य नक्की उलगडले की, कॅलेंडर गर्लची एक सुंदरी मल्ल्याच्या आयुष्यात एअरलाईन्सची कू्र सदस्य राहिली आहे. बॉलिवूडमध्ये चर्चा इथपर्यंत होती की, मल्ल्याने पडद्याच्या मागे राहून कित्येक चित्रपटांना फायनान्स केले आहे. सुनील शेट्टी आणि संजय दत्त सोबतच्या दिग्दर्शक मणिशंकरच्या एका चित्रपटात विजय मल्ल्याचा पैसा लागल्याची चर्चा होती. मात्र मल्ल्यांनी कधीही हे मान्य केले नाही. सुनील शेट्टी पासून ते शाहरुख आणि सलमानपर्यंत मल्ल्याचे सर्व स्टार्सशी जवळचे संबंध राहिले.