शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO-स्ट्रेचर नसल्याने एक्स-रेसाठी पतीला न्यावं लागलं फरफटत !

By admin | Updated: June 2, 2017 16:35 IST

. कर्नाटकातील सरकारी हॉस्पिटलमधील असुविधांचा फटका अशाच एका गरीब रुग्णाला बसला आहे.

ऑनलाइन लोकमत

शिवामोगा, दि. 2- देशातील अनेक सरकारी हॉस्पिटलची अवस्था काय असते हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे.  अपुऱ्या सोयी सुविधांमुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये जायला अनेकदा लोक बिचकतात. पण ज्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही अशा लोकांना उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलचा सहारा घ्यावा लागतो. विशेष म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये असलेल्या असुविधांचा गरिब रूग्णांना जास्त त्रास सहन करावा लागतो. कर्नाटकातील सरकारी हॉस्पिटलमधील असुविधांचा फटका अशाच एका गरीब रुग्णाला बसला आहे. हॉस्पिटलमध्ये स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने एका रुग्णाला चक्क फरफटत न्यावं लागलं. कर्नाटकमधील शिवामोग्गा इथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे.
कर्नाटकातील शिमोगामधल्या मेगन हॉस्पिटलमध्ये घडलेला हा धक्कादायक प्रकार आहे. उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णाला डॉक्टरने एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्या रूग्णाला एक्स रे विभागात घेऊन जायचं होतं. पण त्यावेळी तिथे स्ट्रेचर उपलब्ध नव्हतं. त्यामुळे रुग्णाला फरफटत नेण्याची वेळ त्याच्या पत्नीवर आली. विशेष म्हणजे या महिलेच्या मदतीला तिकडचा एकही कर्मचारी आला नाही. पतीला एक्स-रे काढण्यासाठी घेऊन जायचं आहे, असं सांगितल्यानंतर वॉर्डबॉयने महिलेकडे पैसे मागितल्याचं सांगण्यात येतं आहे. पैसे न दिल्याने त्यांनी स्ट्रेचर देण्यास नकार दिला, असंही सांगण्यात येत आहे. अखेर नाईलाजाने महिलेने आपल्या रुग्ण पतीला एक्स-रे विभागात फरफटत नेले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.