शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

बदलत्या हवामानामुळे भाजीपाला संकटात

By admin | Updated: May 12, 2014 18:29 IST

तापमानातील होणार्‍या बदलांमुळे फळ आणि भाजीपाला संवर्गातील पिके धोक्यात आली आहेत.

पातूर : तापमानातील होणार्‍या बदलांमुळे फळ आणि भाजीपाला संवर्गातील पिके धोक्यात आली आहेत. टमाटर, भेंडी, काकडी, गवार, वांगी, बरबटी, आलू, कोबी, कारले या पिकांना तडाखा बसला आहे. या पिकाला लावलेला खर्चही आता निघणार की नाही, या संकटात भाजीपाला उत्पादक सापडले आहेत. पातूर तालुक्यातील आलेगाव, खामखेड, बोडखा,आगीखेड,शिर्ला यासह अनेक गावातील शेतकरी भाजीपाला पिके घेतात. भाजीपाला पिकावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबूनआहे. पातूर तालुक्यात फुलांची शेती आहे. येथून येणारी फुले हे अकोला व आजूबाजूच्या बाजारपेठेत विक्रीसाठी येतात. बदलत्या हवामानामुळे फुलेही कोमेजत आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकर्‍यांवर असलेली संकटांची मालिका कायम आहे. यामध्ये सर्वच शेतकरी भरडली जात आहेत. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या हातातील खरीप हंगाम गेला. त्यानंतर रब्बीचे पीक घरी येईल, असे वाटत असतानाच वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. त्यातूनही सावरत शेतकर्‍यांनी फळे व भाजीपाला पिकांवर लक्ष केंद्रित केले होते; परंतु आता वातावरणातील सातत्याने होत असलेला बदल, पांढर्‍या माशीचा प्रकोप यामुळे फळे व भाजीपाला पीकही संकटात आले आहे. जे पीक किंवा फळे हाती येत आहे, त्याला बाजारात पाहिजे तसा भाव नाही. अत्यल्प दरात भाजीपाला व फळे व्यापार्‍यांना विकल्याशिवाय शेतकर्‍यांजवळ कोणताही मार्ग नाही. यातून व्यापारी मात्र चांगले पैसे कमवित असले तरी शेतकरी रात्रंदिवस परिश्रम करूनही रिताच आहे. या फळपिकांवरील पांढर्‍या माशीचा बंदोबस्त करण्यासाठी लागणारी औषधी अतिशय महागडी आहे. सध्या शेतकर्‍यांकडे पैसा जमा नसल्यामुळे त्यांना आपली पिके वाचविणे शक्य होताना दिसत नाही. टमाटर, भेंडी, काकडी, गवार, वांगी, बरबटी, आलू, कोबी, कारले यांसह अनेक पिके शेतकर्‍यांच्या शेतात आहे. ढगाळ वातावरण भाजीपाला पिकांसाठी घातक आहे. अशातच भाजीपाल्यांचे भाव गडगडले असल्यामुळे शेतकर्‍यांची चांगलीच कोंडी झाली आहे.