शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वसई विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत

By admin | Updated: September 24, 2014 00:07 IST

वसई विधानसभा मतदारसंघात सेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी उमेदवारी मागीतली असून नुकतीच त्यांची मुलाखतही पार पडली.

दिपक मोहिते, वसईवसई विधानसभा मतदारसंघात सेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी उमेदवारी मागीतली असून नुकतीच त्यांची मुलाखतही पार पडली. अपक्ष उमेदवार विवेक पंडीत यांनी यावेळीही सेनेचे चिन्ह न घेतल्यास शिवसेनेचा उमेदवार रिंगणात येण्याची शक्यता आहे. सेनेचे मदन किणी व विवेक पाटील या दोघांनी निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पंडीत यांनी धनुष्यबाणाऐवजी पुर्वीचेच बॅट हे चिन्ह घेतल्यास येथील लढत पंचरंगी होण्याची शक्यता आहे. पंडीत यांनी सेनेच्या चिन्हावर निवडणुक लढवावी अशी तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे. या इच्छेला मान देऊन पंडीत सेनेच्या तिकिटावर उभे राहतात की पुन्हा अपक्ष म्हणून निवडणुक लढवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सेनेचे ज्येष्ठ नेते मदन किणी यांनी सन १९९० मध्ये त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्याशी दोन हात केले होते. गेली अनेक वर्षे शिवसेनेत कार्यरत असलेले मदन किणी मध्यंतरी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीत दाखल झाले होते. परंतु त्यांना कोणतेही महत्वाचे पद न मिळाल्यामुळे दिड वर्षापुर्वी पुन्हा ते सेनेत परतले. या निवडणुकीमध्ये त्यांनी सेनेकडून तिकिट मागीतले आहे. तर दुसरीकडे सेनेचे माजी तालुका प्रमुख विवेक पाटील यांनीही उमेदवारी लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या दोघांनी काही दिवसापुर्वी सेना नेत्यांची भेट घेतली. विवेक पंडीत हे सेनेच्या चिन्हावर निवडणुक लढवण्यास तयार झाल्यास हे दोघेही माघार घेतील असा अंदाज व्यक्त होत आहे.नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी वगळता इतर कोणत्याही पक्षाचा प्रचार अद्याप सुरू झालेला नाही. ही जागा सेनेकडे आहे परंतु सेनेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याचे नाव नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणात आल्यामुळे सेनेकडे सक्षम उमेदवाराची कमतरता आहे. तर दुसरीकडे भाजपनेही या जागेसाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. आजमितीस भाजपकडे आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेला उमेदवार आहे व त्याची जनमानसात प्रतिमाही चांगली आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जागा भाजपला मिळावी याकरीता प्रयत्नशील आहे. जागेसंदर्भातील वाद जोवर मिटत नाही तोवर महायुतीचा उमेदवार कोण? ही चर्चा रंगतच राहणार. या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीने गेल्या आठवड्यापासून जोरदार प्रचारास सुरूवात केली आहे. नालासोपारा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार आहेत. गेल्या वेळी बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर यांनी सेनेच्या शिरिष चव्हाण यांचा प्रचंड मतांनी पराभव केला. यंदा शिरीष चव्हाण यांच्याजागी नवीन चेहरा देण्याचा सेनेचा प्रयत्न आहे. भाजपने मागीतलेल्या १५० जागांमध्ये या मतदारसंघाचा समावेश आहे. वास्तविक पालघर जिल्ह्णातील डहाणू व नालासोपारा या दोन मतदारसंघावर भाजपने दावा केला होता. परंतु डहाणूवरचा दावा त्यांनी आता सोडला आहे.गेल्या १० वर्षात नालासोपारा मतदारसंघात प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढली. त्या तुलनेत नागरीसुविधा उपलब्ध करणे हे महानगरपालिकेसमोर आव्हान ठरले. या आव्हानास महानगरपालिका यशस्वीरित्या सामोरे गेली.