तपनेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
मंचर : येथील श्री तपनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हर हर महादेवच्या जयघोषात भाविकांनी दर्शन घेतले. अमरनाथ सेवा संघाच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.
तपनेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
मंचर : येथील श्री तपनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हर हर महादेवच्या जयघोषात भाविकांनी दर्शन घेतले. अमरनाथ सेवा संघाच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. येथील श्रीतपनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. भाविकांनी दर्शनासाठी सकाळीच गर्दी केली होती. दर्शनासाठी सुरूझालेली रांग सायंकाळपर्यंत सुरूहोती. हर हर महादेव, बम बम भोलेचा जय घोष करीत भाविकांनी दर्शन घेतले. मंदिर परिसरात फुले व प्रसाद विक्री दुकाने थाटण्यात आली होती. अमरनाथ सेवा संघाच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. सुमारे पंचवीस हजार भाविकांनी त्याचा लाभ घेतला. खिचडी, खजूर, केळी, अंजीर, चहा आदी फराळ भाविकांना देण्यात आला. श्री क्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी जाणार्या भाविकांनी वाहने थांबवून फराळ घेतला. अमरनाथ सेवा संघाचे संस्थापक सूर्यकांत धायबर, दिलीप महाजन, पंडित माशेरे, गणपतराव क्षीरसागर, संजय कडधेकर व सहकार्यांनी व्यवस्था पाहिली. फोटोओळी : महाशिवरात्रीनिमित्त मंचर येथील तपनेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी रांगेतून दर्शन घेतले.