शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वारेमाप वाळू उपशामुळे जलपातळी घटली गिरणाकाठची गावांमधील स्थिती : बंदी नंतरही दिवसरात्र सुरु आहे वाहतूक

By admin | Updated: December 6, 2015 23:51 IST

जळगाव : गिरणा नदीच्या काठावरील गाव परिसरातील वाळूच्या प्रचंड उपशामुळे नदीपात्रातील जलपातळीत घट झाली असताना या गावांना धोका निर्माण झाला आहे. आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, दापोरा या गावांमध्ये अवैध वाळू उपशावरून नागरिक आक्रमक झाले आहेत.

जळगाव : गिरणा नदीच्या काठावरील गाव परिसरातील वाळूच्या प्रचंड उपशामुळे नदीपात्रातील जलपातळीत घट झाली असताना या गावांना धोका निर्माण झाला आहे. आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, दापोरा या गावांमध्ये अवैध वाळू उपशावरून नागरिक आक्रमक झाले आहेत.

विहिरीची जलपातळी घटली
जिल्हाभरातील २८ ग्रामपंचायतींनी वाळू उपशास नकार दिला आहे. या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात झालेल्या प्रचंड वाळू उपशामुळे तेथील पाणी पातळीत घट झाली आहे. या भागातील विहिरींचे जलस्त्रोत कमी होण्याचे प्रकार वाढले आहे. त्याचा फटका हा आजूबाजूच्या गावातील सिंचनावर होत आहे. पाण्याअभावी या भागातील पिकांचे नुकसान होऊ लागले आहे.

पाणी पुरवठ्यावर झाला परिणाम
गिरणा नदीच्या काठी अनेक गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदून त्या ठिकाणावरून गावापर्यंत जलवाहिनी टाकल्या आहेत. गिरणा नदी काठावर असलेल्या या विहिरींना बारा महिने पाणी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई फारशी या गावांना भासत नव्हती. मात्र वाळूच्या प्रचंड उपशामुळे नदीपात्रातील विहिरीची जलपातळी घटल्याने त्याचा फटका हा पाणीपुरवठा यंत्रणेवर होत आहे. त्याचा परिणाम म्हणून शिरसोलीसह अनेक गावांमध्ये आजही सात ते आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

तापी नदी पात्राकडे वळविला मोर्चा
जिल्हा प्रशासनाने वाळूच्या ४४ गटांसाठी लिलाव प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र आजही गिरणा काठच्या आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, बांभोरी, दापोरा, कुवारखेडे, नागझिरी, धानोरा बुद्रुक गावांमधून मोठ्या प्रमाणात अवैध स्वरुपाचा वाळूचा उपसा सुरु आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाळूचा उपसा झाल्यामुळे बांधकामासाठी आवश्यक असलेली चांगल्या प्रतीच्या वाळूचा साठा हा कमी होत असल्याने वाळू उचल करणार्‍या धुळे, नाशिक, मालेगाव येथील व्यावसायीकांनी अन्य जिल्ह्यातील तापी नदीकडे आपला मोर्चा वळविला आहे.