शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

सुट्ट्या पैशांवरून झाली बाचाबाची, बस कंडक्टरने चालत्या बसमधून मारली उडी

By admin | Updated: September 26, 2016 14:51 IST

महिला प्रवाशासोबत पैशांवरून झालेल्या बाचाबाचीनंतर बसच्या कंडक्टरने चक्क चालत्या बसमधून नदीत उडी मारली

ऑनलाइन लोकमत
मंगळुरू, दि. 26- कर्नाटक स्टेट टुरीझमच्या बसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. महिला प्रवाशासोबत पैशांवरून झालेल्या बाचाबाचीनंतर बसच्या कंडक्टरने चक्क चालत्या बसमधून नदीत उडी मारली. मंगळुरूहून सुब्रमण्याला जाणा-या बसमध्ये ही घटना घडली. देविदास शेट्टी (41) असं त्या कंडक्टरचं नाव आहे.
 
सुब्रमण्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील एका महिला प्रवाशाने शेट्टी यांच्याकडे 500 रूपये दिले होते असं सांगत पैसे परत देण्याची मागणी केली. त्यावर शेट्टी यांनी महिलेला तुम्ही 100 रूपये दिल्याचं सांगितलं. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाचीला सुरूवात झाली.  त्यानंतर हे प्रकरण इतकं वाढलं की त्यांना काबाडा पोलिस स्थानकात जायला लागलं. पोलिसांनी शेट्टीच्या बॅगेतील पैशांची मोजणी केली असता 500 रूपये जास्त आढळून आले. त्यानंतर शेट्टी यांनी  महिलेची माफी मागितली व बसचा पुढचा प्रवास सुरू झाला. मात्र, बस कुमारधारा नदीजवळ आली असता शेट्टी यांनी थेट चालत्या बसमधून नदीत उडी मारून आत्महत्या केली.    
 
शेट्टी यांच्या तिकीटाच्या बॅगमध्ये चिट्ठी मिळाली, त्यावर आत्मसन्मानाला तडा गेली असल्याने आता जगण्यात काही अर्थ नाही असं लिहीलं होतं.