शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडमध्ये सत्तेसाठी फोडाफोडीचे सत्र सुरू

By admin | Updated: March 20, 2016 02:14 IST

उत्तराखंडमधील सत्ताधारी काँग्रेसमधील एक गट फुटून भाजपाकडे गेल्याने येथील हरिश रावत सरकार संकटात सापडले असून, काँग्रेस बंडखोरांच्या मदतीने सरकार

डेहराडून/नवी दिल्ली : उत्तराखंडमधील सत्ताधारी काँग्रेसमधील एक गट फुटून भाजपाकडे गेल्याने येथील हरिश रावत सरकार संकटात सापडले असून, काँग्रेस बंडखोरांच्या मदतीने सरकार स्थापनेचे भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. रावत सरकार अल्पमतात आले असल्याने ते बरखास्त करावे, अशी मागणी भाजपाने राज्यपालांकडे केली आहे. मात्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना २८ मार्चपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.शनिवारी संध्याकाळी रावत यांनी फुटलेले काही आमदार परतल्याचा आणि भाजपाचे काही आमदारही आपल्याकडे असल्याचा दावा केला. आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विधानसभाध्यक्षांनी पक्षांतरविरोधी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची ताकीद दिली आहे. भाजपाच्या अविश्वास प्रस्तावाबाबत विचारले असता ते म्हणाले की, असा प्रस्ताव विधानसभेत आल्यावर त्याचा निर्णय घेतला जाईल.काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा डावभाजपावर हल्लाबोल करताना राजकीय सत्ता आणि पैशाची लालूच दाखवून भाजपेतर सरकार अस्थिर करण्याचा डाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा खेळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, मोदी-शहा जोडगोळी या देशातील निर्वाचित सरकारे बळजबरीने उलथून लावू पाहत आहे. अरुणाचल प्रदेशपाठोपाठ आता उत्तराखंडात हीच खेळी खेळली जात आहे.काँग्रेसचे ९ बंडखोर भाजपाकडेभाजपाचे नेते श्याम जाजू म्हणाले की, सरकार स्थापनेसाठी पक्षाजवळ पुरेसे संख्याबळ आहे. काँग्रेसचे ९ बंडखोर आमदार दिल्लीत पोहोचले असून, ते आमच्या संपर्कात आहेत.राज्यपालांची भेट घेणार पक्षांतरबंदी कायद्यान्वये बंडखोर आमदारांची संख्या कमी असली तरी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय बहुगुणा हेही भाजपाकडे गेल्याने त्यांच्या जोरावरच सरकार स्थापनेसाठी भाजपा नेते प्रयत्नशील आहेत. त्यासाठी ते राज्यपालांची भेट घेणार आहेत.