अर्बन बॅँक फसवणूक : तपासाला प्रारंभ * न्यायालयाने दिले होेते आदेश
By admin | Updated: May 10, 2014 19:41 IST
अकोला- दी अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅँक फसवणूक प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकार्यांनी दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी संचालकांचा तपास सुरू केला आहे.
अर्बन बॅँक फसवणूक : तपासाला प्रारंभ * न्यायालयाने दिले होेते आदेश
अकोला- दी अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅँक फसवणूक प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकार्यांनी दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी संचालकांचा तपास सुरू केला आहे. अकोला अर्बन बॅँकेने प्रथम ४ जुलै २०१३ रोजी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात ३ कोटी ७२ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दुसर्या टप्प्यात पोलिसांनी ८ डिसेंबरला १७ फर्मच्या भागीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या एफआयआरमध्ये ६४ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे नमूद करण्यात आले होते. उपरोक्त गुन्ाचा तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्रही सादर केले. दरम्यान, या फसवणूकप्रकरणी बॅँकेच्या संचालकांविरुद्ध कारवाईची मागणी भागधारक पुरुषोत्तम व्यास यांनी न्यायालयात केली. व्यास यांच्या अर्जानुसार मुख्य न्यायदंडाधिकार्यांनी पोलिसांनी तपास करण्याचे आदेश दिले. दरम्यान, पोलिसांनी शनिवारपासून तपासाला प्रारंभ केला आहे. फसवणूक प्रकरणात निष्पन्न झालेल्या बाबींमध्ये संचालकांचा सहभाग होता काय, हे पोलिस तपासत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.