शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दुग्धाभिषेकाद्वारे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण विलंब होत असल्याने क्रांती दल संघटनेचा निर्णय : काही क्षणात कापडाने झाकला पोलिसांनी पुतळा

By admin | Updated: January 15, 2016 00:13 IST

महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी होत असलेल्या विलंबामुळे महाराणा प्रताप क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दुग्धाभिषेक करीत पुतळ्याचे अनावरण केले.

जळगाव : बहिणाबाई उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी होत असलेल्या विलंबामुळे महाराणा प्रताप क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दुग्धाभिषेक करीत पुतळ्याचे अनावरण केले. काही वेळेनंतर पोलिसांनी पुतळ्याला पुन्हा झाकल्याने वाद निर्माण होण्याचे चिन्ह आहेत.बहिणाबाई उद्यान परिसरात क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा तयार करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा पुतळा काळ्या कापडाने झाकलेला आहे. पुतळा अनावरणाच्या शुभारंभासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रणदेखील महाराणा प्रताप पुतळा समितीतर्फे देण्यात आले होते. त्यानुसार १७ जानेवारी रोजी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्याचे समितीने जाहीर केले होते.दुग्धाभिषेक व पूजन करीत केले अनावरण१७ रोजी पुतळ्याचे अनावरण होण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने क्रांती दल संघटनेचे तीन ते चार कार्यकर्ते गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पुतळ्याच्या ठिकाणी जमले. सुरुवातीला पुतळ्याभोवती गुंडाळलेला कापड कार्यकर्त्यांनी हटविला. त्यानंतर पुतळा पाण्याने स्वच्छ करीत त्यावर दुग्धाभिषेक केला. त्यानंतर सचिन राजपूत व सहकार्‍यांनी पुतळ्याचे पूजन करीत पुष्पहार अर्पण केला. यावेळी कार्यकर्त्यांनी महाराणा प्रताप यांच्या नावाने जयघोष केला.जिल्हापेठ पोलीस दाखलमहाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी कापडाने पुतळ्याला पुन्हा झाकले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीत पुतळा अनावरणाबाबत माहितीदेखील घेतली. त्यानंतर कार्यकर्ते आपल्या घराकडे रवाना झाले.