शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या घोषणेला वाटाण्याच्या अक्षता

By admin | Updated: March 24, 2015 23:55 IST

जनधन योजना : विम्याची रक्कम फक्त ३० हजार

जनधन योजना : विम्याची रक्कम फक्त ३० हजारसंकेत शुक्लनाशिक : भारतातील तळागाळातील लोकांनी राष्ट्रीयीकृत बॅँकेत खाते उघडावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या जनधन योजनेतील लाभार्थ्यांना असलेल्या विमा कवचाच्या रकमेवरून शासनामध्येच गोंधळ असून, त्या अंतर्गत दिवंगत खातेधारकाच्या वारसाला जनधन नव्हे, तर आम आदमी विमा योजनेंतर्गत रक्कम दिली गेल्याने शासनाने एकप्रकारे पंतप्रधानांच्या घोषणेलाच वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा आरोप होत आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर पहिल्याच स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जनधन योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार राष्ट्रीयीकृत बॅँकेत झिरो बॅलन्सवर खाते उघडणार्‍या नागरिकांनाही विम्याचे संरक्षण कवच देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले होते. हे कवच सुमारे एक लाखाचे असेल, असेही ते म्हणाले होते. त्यानुसार या योजनेला देशभरात चांगले योगदान मिळाले. सर्वसाधारण गटातील लाखो नागरिकांनी त्याअंतर्गत विविध राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये खातेही उघडले. ऑक्टोबर महिन्यापासून या योजनेला प्रतिसाद मिळत असतानाच अवघ्या काही दिवसांनंतर त्यातील काही खातेधारकांचा मृत्यूही झाला. मोदींनी घोषणा केल्याप्रमाणे खातेधारकांच्या वारसांनी बॅँकेत विमा रकमेसाठी विचारणा केली. विम्याची जबाबदारीही बॅँकेवरच टाकण्यात आली असल्याने बॅँकेने त्यानुसार शासनाच्या अंगिकृत असलेल्या भारतीय आयुर्विमा कंपनीकडे त्याबाबत विचारणा झाल्यानंतर शासनाने जनधन योजनेतील लाभार्थ्यांना जुन्याच आम आदमी विमा योजनेनुसार मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे कळवण्यात आले. त्यानुसार नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्‘ांतील मयत खातेधारकांच्या वारसांना प्रत्येकी ३० हजार रुपये देण्यात आले. ५० खातेधारकांना लाभजनधन योजनेत खाते उघडलेल्या आणि त्यानंतर अल्पावधीतच मृत्यू झालेल्या सुमारे ५० खातेधारकांच्या विमा रकमेबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्यानुसार शासनाशी संपर्क साधला असता प्रत्येक मृत खातेधारकाच्या वारसाला आम आदमी विमा योजनेप्रमाणे ३० हजार रुपये देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार भारतीय आयुर्विमा कंपनीने सुमारे ५० खातेधारकांच्या वारसांना त्याचा मोबदला दिला आहे. आम आदमी विमा योजनेत नैसर्गिक मृत्यूसाठी ३० हजार रुपये देण्यात येतात, तर अपघाती मृत्यूमध्ये ७५ हजार रुपये दिले जातात. जनधनमध्ये पंतप्रधानांनी एक लाखाची घोषणा केली होती. शासनाच्या आदेशानुसारच परिपूर्तीजनधन योजनेतील सभासदाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसाने विमा रकमेबद्दल बॅँकेत विचारणा केली. बॅँकेच्या अधिकार्‍यांनी त्यानुसार आमच्याकडे क्लेम पाठवले. हे क्लेम कोणत्या पद्धतीने द्यावे याचे मार्गदर्शन घेण्यासाठी जेव्हा आमच्या वरिष्ठ कार्यालयात संपर्क साधला तेव्हा आम आदमीच्या नियमांनुसार क्लेम (परिपूर्ती) देण्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यानुसार प्रत्येक सभासदाच्या वारसाला आम्ही ३० हजार रुपये प्रदान केले.- शेखर मोघे (सरचिटणीस, विमा कामगार युनियन)