शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचे अस्वस्थ राजकारण

By admin | Updated: September 26, 2014 05:39 IST

गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेशी असलेला घरोबा संपुष्टात आल्याने शहर भाजप मध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे

पुणे : गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेशी असलेला घरोबा संपुष्टात आल्याने शहर भाजप मध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे महापालिकेत शिवसेने पेक्षा 10 नगरसेवक जास्त असले, तरी भाजपमध्ये असलेले गटतटाचे राजकरण आणि भाजपच्या तुलनेत शिवसेनेची शहरात असलेली संघटानात्मक बांधणी यामुळे शहरातील आपले तीन बालेकिल्ले वाचविण्याचे आव्हान शहर भाजप पुढे असल्याने भाजपमध्ये अस्वस्थतेचे वातावर निर्माण झाले आहे.अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल शिरोळे यांना तब्बल 2 लाख 96 हजार मताधिक्य मिळाले. त्यात शिवसेनेचाही मोठा वाटा होता. विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार असलेल्या कोथरूड मतदारसंघातून शिरोळे यांना तब्बल 1 लाख 22 हजार मते मिळाली होती. त्यामुळे शिवसेनेची ताकद पुन्हा अधोरेखीत झाली होती. तसेच मागील विधानसभा निवडणूकीतही नव्याने निर्माण झालेल्या पर्वती मतदारसंघातही शिवसेनेच्या मदतीने भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ विजयी झाल्या होत्या.2011 मध्ये झालेल्या खडकवासला मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणूकीत शिवसेनेच्या मदतीने भाजपचे उमेदवार भिमराव तापकीर मोठया मताधिक्क्याने विजयी झाले होते. मात्र, निवडणूका अवघ्या तीन आठवडयांवर येऊन ठेपल्या असताना आता भाजपला सर्व मतदारसंघाची पुनर्बाधनी करावी लागणार आहे. मात्र, युती होणार नाही हे गृहीत धरून सर्व मतदारसंघातून सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी भाजपने या पूर्वीच केली होती. त्यात विद्यमान तीन आमदारांबरोबरच शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघात युती असल्याने भाजपकडून विधानसभेनंतर पक्षबांधणी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे सर्व शक्यता गृहीत धरूनच भाजपने सेनेच्या ताब्यात असलेल्या कोथरूड, कँन्टोन्मेंट, वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघातून उमेदवारांना तयारी करण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार, अनेक इच्छूकांनी तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे भाजपला या मतदारसंघामध्ये उमेदवारांसाठी फारशी शोधाशोध घ्यावी लागणार नसली तरी, लोकसभेत चाललेला मोदी फँक्टर विधानसभेत न चालल्यास सेनेच्या उमेदवारा बरोबरच भाजपच्या उमेदवारांची सरळ सरळ लढत होनार आहे. त्यात शिवसेना वरचढ होण्याची शक्यता असल्याने भाजपमध्ये ही अस्वस्थता आहे.(प्रतिनिधी)