शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रसारभारती’वर अघोषित सेन्सॉरशिप?

By admin | Updated: April 2, 2016 04:20 IST

‘प्रसार भारती’वरील अघोषित सेन्सॉरशिपमुळे ‘आकाशवाणी’ आणि ‘दूरदर्शन’च्या अधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. या सरकारी प्रसारमाध्यमांना पूर्ण स्वायत्तता देण्याच्या

- शीलेश शर्मा, नवी दिल्ली

‘प्रसार भारती’वरील अघोषित सेन्सॉरशिपमुळे ‘आकाशवाणी’ आणि ‘दूरदर्शन’च्या अधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. या सरकारी प्रसारमाध्यमांना पूर्ण स्वायत्तता देण्याच्या केवळ गप्पा मारल्या जातात पण प्रत्यक्षात मात्र माहिती आणि प्रसारण मंत्रालय आपले सर्व निर्णय भाजपा आणि रा. स्व. संघ मुख्यालयाच्या शिफारशींवरून घेत असल्याचे दिसत असल्याने अधिकारीवर्ग त्रस्त झाल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.ताज्या घडामोडींशी संबंधित असलेल्या प्रत्येक कार्यक्रमाची भाजपा आणि संघ मुख्यालयात समीक्षा करण्यात येते. एखाद्या कार्यक्रमात संघाच्या धोरणांच्या विरोधात भाष्य वा टिप्पणी करण्यात आली असेल तर संबंधित अधिकाऱ्याला फोनवर तात्काळ ताकीद दिली जाते. अशाप्रकारे एखाद्या अधिकाऱ्याला तीनदा ताकीद मिळाल्यानंतर त्या अधिकाऱ्याविरुद्ध मंत्रालय अशी काही कारवाई करते की त्याला काम करणेही कठीण जाते, असे ‘आकाशवाणी’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.हा हस्तक्षेप एवढ्यावरच थांबत नाही, तर कोणत्या कार्यक्रमात कोणता वक्ता राहील, याचा निर्णयही भाजपा आणि संघ मुख्यालयातूनच घेतला जातो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या एका विशेष विभागाने तयार केलेली वक्त्यांची यादी ‘आकाशवाणी’ आणि ‘दूरदर्शन’ला देण्यात आली आहे. या यादीत रा. स्व. संघाच्या विचारसरणीचे पत्रकार, प्राध्यापक आणि संघाचे स्वयंसेवक यांच्याच नावांचा समावेश आहे. एखाद्या कार्यक्रमासाठी वक्त्याला बोलावण्याचा प्रसंग आला तर त्याची निवड या यादीत असलेल्या नावांमधूनच करण्यात आली पाहिजे, अशी ताकीद देण्यात आली आहे.‘भाजपा आणि संघ मुख्यालयातून मिळणाऱ्या निर्देशांचे पालन कशाप्रकारे केले पाहिजे, हे लिखित स्वरूपात नसले तरी अतिरिक्त महासंचालक आणि त्यापेक्षा वरच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना थेट मंत्रालयात बोलावून मौखिक आदेश देण्यात आलेले आहेत,’ अशी माहिती ‘दूरदर्शन’च्या अन्य एका अधिकाऱ्याने दिली. ‘आज केंद्रात असलेल्या सरकारच्या कार्यकाळात जे काही सुरू आहे ते आपण ४० वर्षांच्या आपल्या नोकरीत अन्य कोणत्याही सरकारच्या कार्यकाळात कधी पाहिले नाही. अशा परिस्थितीत काम करणे कठीणच नाही तर अशक्य झाले आहे,’ असे रजेवर असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.उघड बोलायची चोरी - आकाशवाणी आणि दूरदर्शनमध्ये सध्या कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. मंत्रालयाने नव्या नियुक्त्यांवर बंदी घातली आहे. जुने कर्मचारी निवृत्त होत आहेत. परिणामी सर्वच कामकाज कंत्राटी पद्धतीने सुरू आहे. - मिळालेले कंत्राट वा काम रद्द होईल, या भीतीपोटी आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही ठिकाणी संघ, भाजपा आणि मंत्रालयाकडून मिळणाऱ्या निर्देशांबाबत कुणी उघडपणे बोलायला तयार नाही.