शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

‘भूमिगत’ ३०० कोटीतच

By admin | Updated: December 1, 2015 00:29 IST

औरंगाबाद : निधीअभावी अडचणीत आलेली ४६७ कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना आयुक्तांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : निधीअभावी अडचणीत आलेली ४६७ कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना आयुक्तांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळण्याच्या आयुक्तांच्या सूचनेनंतर ठेकेदाराने ही योजना ३०० कोटी रुपयांतच पूर्ण करून देण्याची तयारी दाखविली आहे. शहरातील सुस्थितीमधील लाईन न बदलता हे काम केले जाणार आहे. याबरोबरच पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार)च्या खर्चातही कपात करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी भूमिगत गटार योजनेच्या कामाची आढावा बैठक घेतली. बैठकीला शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, घारपुरे आणि खिल्लारी इन्फ्राचे संचालक, फोट्रेस या पीएमसीचे संचालक ए.एस. कुमार आदी अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला योजनेंतर्गत आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती देण्यात आली. केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेंतर्गत शहरासाठी ४६७ कोटी रुपयांची ही योजना मंजूर झालेली आहे. केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात १४६ कोटी रुपयांचे अनुदान दिल्यानंतर वर्षभरापूर्वी योजनेच्या कामाला सुरूवात झाली; परंतु आता केंद्र सरकारने जुनी योजना बंद केल्यामुळे अनुदानाचा दुसरा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, ही योजना अडचणीत आली आहे. यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यावर तोडगा म्हणून केंद्रेकर यांनी अनावश्यक कामे करू नका, जिथे पैसा वाचविता येईल तिथे बचत करा, अशा सूचना ठेकेदार कंपनीच्या संचालकांना दिल्या. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने योजनेचे काम ३०० कोटी रुपयांतच पूर्ण करून देण्यात येईल, असा दावा केला. शहरातील सुस्थितीमधील लाईन न बदलता हे काम केले जाईल, असे यावेळी ठेकेदाराने सांगितले.