शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

निर्भयाच्या अल्पवयीन बलात्काऱ्याची अज्ञातस्थळी रवानगी

By admin | Updated: December 20, 2015 01:53 IST

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याप्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपीस रविवारी होणाऱ्या सुटकेच्या

नवी दिल्ली/बदायू : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याप्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपीस रविवारी होणाऱ्या सुटकेच्या पूर्वसंध्येला बाल सुधारगृहातून एका अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले.दरम्यान, या अल्पवयीन आरोपीची शिक्षा वाढविण्याची मागणी होत असतानाच बदायूमधील त्याच्या गावातील काही लोकांनी त्याच्या प्रवेशास विरोध करण्याची तयारी केली आहे. उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन आरोपीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती वर्तविण्यात आली असून, अनेक संस्था करडी नजर ठेवून आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्याच्या सुटकेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. अज्ञातस्थळावरूनच रविवारी त्याची सुटका करण्यात येईल. या अल्पवयीन आरोपीच्या पुनर्वसनाची योजना तयार करण्यात आली असल्याचे दिल्ली सरकारने सांगितले आहे. या योजनेंतर्गत अल्पवयीन आरोपीस १० हजार रुपयांची आर्थिक मदत आणि शिवणयंत्र देण्यात येईल. जेणेकरून त्याला कपडे शिवण्याचे काम सुरू करता येऊ शकेल. १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत पॅरामेडिकलची २३ वर्षीय विद्यार्थिनी निर्भयावरील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील एका आरोपीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याने, त्याची गणना कायद्यातील व्याख्येनुसार बालगुन्हेगारात झाली होती. त्यानुसार बालगुन्हेगार न्याय मंडळाने त्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावली होती आणि उत्तर दिल्लीच्या एका सुधारगृहात ठेवण्यात आले होते. बलात्काराच्या घा घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. गावात प्रवेशास बंदीची तयारीदरम्यान, तीन वर्षांची शिक्षा भोगून सुटणाऱ्या या अल्पवयीन आरोपीस त्याच्या बदायू येथील गावातील काही लोकांनी प्रवेशबंदी घालण्याचा विचार केला आहे. निर्भयाचा दोषी गावात परतावा, अशी लोकांची इच्छा नाही. गावातील एक वयोवृद्ध नागरिक फुलचंद यांनी सांगितले की, निर्भयाकांडातील या आरोपीचे कृत्य अत्यंत घृणास्पद असून, त्याला आता गावात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे गावाची देश-विदेशात प्रचंड बदनामी झाली. या घटनेनंतर शहरात शिकण्यासाठी गेलेल्या गावातील इतर तरुणांकडेही संशयाने बघितले जात आहे. एवढेच काय पण त्यांना कुणी नोकरी द्यायलाही तयार नाही. परिणामी गावात बेरोजगारांची संख्या वाढली आहे.फुलचंद यांच्याप्रमाणेच अनिल, कुन्नू, रामपाल, गुलाब आणि नरेशसह इतरही अनेक नागरिकांना निर्भयाचा गुन्हेगार आता गावात नको आहे. परंतु काहींनी त्याला गावात आणून नव्याने चांगले जीवन जगण्याची संधी मिळाली पाहिजे, असे मत मांडले आहे.या अल्पवयीन आरोपीस परत आणण्यासाठी त्याच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य दिल्लीला जाणार नाही. परंतु बाल सुधारगृहातून सुटकेनंतर त्याने थेट गावात यावे आणि अत्यंत हलाखीचे जीवन जगत असलेल्या आपल्या कुटुंबाला मदत करावी, अशी त्यांची इच्छा असल्याचे त्याच्या आईने सांगितले. (वृत्तसंस्था)