शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

जाहिरातीत विष्णूरुपात प्रकटलेल्या धोनी विरोधात अजामीनपत्र वॉरंट

By admin | Updated: January 8, 2016 15:58 IST

भगवान विष्णूच्या रुपात प्रसिध्द झालेल्या छायाचित्रा प्रकरणी महेंद्रसिंह धोनीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ८ -  मासिकाच्या मुखपृष्ठावर भगवान विष्णूच्या रुपात प्रसिध्द झालेल्या छायाचित्रा प्रकरणी अनंतपूर न्यायालयाने भारताच्या वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 
न्यायालयाने धोनीला २५ फेब्रुवारीला होणा-या सुनावणीच्यावेळी न्यायालयात हजर रहाण्याचे आदेश दिले आहेत. २०१३ मध्ये मासिकाच्या मुखपृष्ठावर धोनीचे भगवान विष्णूच्या रुपातील छायाचित्र प्रसिध्द झाले होते. 
बिझनेस टुडे मासिकाच्या मुखपृष्ठावर २०१३ मध्ये धोनीचे भगवान विष्णूच्या रुपातील छायाचित्र प्रसिध्द झाले होते. या छायाचित्रात धोनीने  खाण्याच्या विविध वस्तू हातात पकडल्याचे दिसत आहे. धोनीच्या या छायाचित्रामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते जयकुमार हिरेमठ यांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. 
भारतीय दंड विधान सहितेच्या कलम २९५ आणि ३४ अंतर्गत धोनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  मी देवाच्या रुपातील माझे छायाचित्र काढले नव्हते तसेच त्या छायाचित्रासाठी मासिकाकडून कोणतेही पैसे घेतले नव्हते असे धोनीने न्यायालयाला सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१५ मध्ये धोनी विरोधातील गुन्हेगारी कारवाईची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले होते. धोनी सध्या ऑस्ट्रेलिया दौ-यावर असून तिथे भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलिया विरुध्द पाच एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे.