सिडकोच्या घरावर टोलेजंग इमारती अनधिकृत बांधकाम : चिरीमिरी देऊन मिळते परवानगी
By admin | Updated: May 8, 2014 21:08 IST
सिडको : सिडको प्रशासनाकडून आर्थिक तडजोड करून घरावर अनधिकृतपणे बांधकामास परवानगी देण्यात येत असल्याने सिडकोच्याच घरांवर आज टोलेजंग इमारती उभ्या राहिलेल्या दिसत आहेत. परंतु या इमारतीलगतच उच्च दाबाच्या वीजताराही येत असल्याने अनेकदा अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागण्याचे प्रकारही घडल्याने याबाबत दक्षता घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
सिडकोच्या घरावर टोलेजंग इमारती अनधिकृत बांधकाम : चिरीमिरी देऊन मिळते परवानगी
सिडको : सिडको प्रशासनाकडून आर्थिक तडजोड करून घरावर अनधिकृतपणे बांधकामास परवानगी देण्यात येत असल्याने सिडकोच्याच घरांवर आज टोलेजंग इमारती उभ्या राहिलेल्या दिसत आहेत. परंतु या इमारतीलगतच उच्च दाबाच्या वीजताराही येत असल्याने अनेकदा अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागण्याचे प्रकारही घडल्याने याबाबत दक्षता घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.सिडको प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना परवडतील या दृष्टीने योजना क्रमांक १ ते ६ ची निर्मिती केली. यातील १ ते ५ या योजना सिडको प्रशासनाने महापालिकेकडे हस्तांतरित केल्या आहेत. या पाचही योजनांना मनपाकडून मूलभूत सुविधा मिळत असल्या, तरी घर हस्तांतरण करणे, बांधकाम करणे, ना हरकत दाखला देणे हे अधिकार मात्र सिडकोने त्यांच्याकडेच ठेवले आहेत. त्यामुळे अर्थातच बांधकाम परवानगी घेण्यासाठी नागरिक सिडको प्रशासनाकडे जातात. मूळ घरांवर फक्त एक मजला बांधकाम करण्याची अधिकृत परवानगी सिडकोने राखून ठेवलेली आहे. परंतु असे असतानाही सिडको प्रशासनातील अधिकार्यांच्या आर्थिक चिरीमिरीतून सिडकोच्या मूळ घरांवर आज टोलेजंग इमारती उभारल्या गेल्या आहेत. अनधिकृतपणे उभारलेल्या इमारतींवर कारवाई करण्याची जबाबदारी सिडकोची असल्याचे मनपाकडून सांगितले जाते. यामुळे सिडको व मनपा यांच्या वादात मात्र सिडको भागात अतिक्रमणांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. अतिक्रमणांमुळेच आज पुन्हा त्रिमूर्ती चौकात तीन मजली इमारतींवर काम करणार्या सुरेश पडवी हा कामगार घरातील उच्च दाबाच्या वीजतारांचा शॉक लागून जखमी झाल्याची घटना घडली आहे.फोटो - ०२ पीएचएमए- ९२जोड आहे....