अखेर विखे कारखाना बिनविरोध सहकार : विरोधकांच्या पॅनेलचा फुसका बार
By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST
राहाता : विरोधकांनी आव्हान उभे केल्याने विखे कारखान्याची निवडणूक होईल, असे वाटत असतानाच माघारीच्या वेळी विरोधकांचा बार फुसका निघाला अन् कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. शिल्लक असलेल्या ७३ उमेदवारांपैकी तब्बल ५२ जणांनी माघार घेतल्याने सत्ताधारी २१ जणांचेच अर्ज राहिले. परिणामी कारखान्याचे संचालक मंडळ आपोआप निवडले गेले.
अखेर विखे कारखाना बिनविरोध सहकार : विरोधकांच्या पॅनेलचा फुसका बार
राहाता : विरोधकांनी आव्हान उभे केल्याने विखे कारखान्याची निवडणूक होईल, असे वाटत असतानाच माघारीच्या वेळी विरोधकांचा बार फुसका निघाला अन् कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. शिल्लक असलेल्या ७३ उमेदवारांपैकी तब्बल ५२ जणांनी माघार घेतल्याने सत्ताधारी २१ जणांचेच अर्ज राहिले. परिणामी कारखान्याचे संचालक मंडळ आपोआप निवडले गेले.पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे कारखान्याची निवडणूक १५ मार्चला होणार होती. त्यादृष्टीने यावेळी विरोधकांनी पॅनेल तयार करण्याची पूर्ण व्यूहरचना केली. जि. प.चे माजी अध्यक्ष अरूण कडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी २३ अर्ज दाखल केले. त्यात छाननीत प्रमुख शिलेदारांसह ११ जणांचे अर्ज बाद झाल्याने निडणुकीत आव्हान उभे राहील की नाही, याबाबत उत्सुकता होती. कडू यांनी अर्ज बाद झाल्याच्या निर्णयाला सहनिबंधकांकडे अपीलही केले. मात्र त्यांच्या इतर सहकार्यांनी माघारीच्या दिवशी अर्ज काढून घेतल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन सोनवणे यांनी काम काम पाहिले. बिनविरोध उमेदवार असे - सर्वसाधारण मतदार संघ- अनिल सावळेराम भोसले, कैलास सूर्यभान तांबे, भागवत तात्याबा उंबरकर, राजेंद्र शिवाजी घोलप, प्रताप सकाहारी तांबे, मच्िंछद्र विश्वनाथ पावडे, शिवाजी नरहरी घोलप, भगवंत पूजाजी जोर्वेकर, पाराजी मोहन धनवट, राधाकृष्ण एकनाथ विखे पाटील, सुजय राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र अण्णासाहेब खर्डे, विजय माणिकराव खर्डे, आण्णासाहेब माधव बेंद्रे, रामचंद्र निवृत्ती भवर, सोसायटी मतदारसंघ- रामदास चंद्रभान देठे, इतर मागासवर्ग- अशोक राजाराम गाडेकर, महिला - रजनी विनायक बालोटे, सुनंदा रामराव खर्डे, अनु. जाती-जमाती - सारंधर नामदेव दुशिंग, भटक्या विमुक्त जाती - पोपट चांगदेव लाटे.-------------सहकारातील सगळ्या प्रकारच्या सत्ता विखे पाटील यांच्याकडे एकवटल्या असताना त्यांना विरोधकांची भीती का वाटते, हे कळत नाही. त्यांनी रडीचाच डाव मांडला आहे. आमचे अर्ज बाद झाले, याबाबत अपील केले होते. परंतु पुढे काय झाले ते पहावे लागेल. - अरूण कडू, माजी अध्यक्ष, जि. प.फोटो - ०७ प्रवरा विखे कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक मंडळ.