शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

उल्फाचा जहाल नेता चेतिया भारताच्या स्वाधीन

By admin | Updated: November 12, 2015 03:24 IST

भारतासाठी दोन दशकांपासून फरार असलेला, पण गेली १८ वर्षे शेजारच्या बांगलादेशच्या तुरुंगात असलेला उल्फाचा जहाल नेता गोलप बरुआ ऊर्फ अनुप चेतिया याला बुधवारी शेख हसीना सरकारने भारताच्या स्वाधीन केले

नवी दिल्ली : भारतासाठी दोन दशकांपासून फरार असलेला, पण गेली १८ वर्षे शेजारच्या बांगलादेशच्या तुरुंगात असलेला उल्फाचा जहाल नेता गोलप बरुआ ऊर्फ अनुप चेतिया याला बुधवारी शेख हसीना सरकारने भारताच्या स्वाधीन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपानंतर बांगलादेश सरकारने बुधवारी सकाळी त्याला भारताच्या ताब्यात दिले. अर्थात या साऱ्या प्रक्रियेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ईशान्य भारतातील शांततेसाठी मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रक्रियेला या घटनेतून आसाममध्ये अधिक चालना मिळणार आहे.काही दिवसांपूर्वीच इंडोनेशियाने मुंबईतील कुख्यात गँगस्टर छोटा राजन याला भारताच्या ताब्यात दिले. त्यानंतर लगेचच ही महत्त्वपूर्ण घटना झाली आहे. ४८ वर्षीय चेतिया हा बंदी घालण्यात आलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट आॅफ आसाम (उल्फा)चा संस्थापक सरचिटणीस आहे. हत्याकांड, अपहरण, बँकेवरील दरोडे आणि खंडणी वसुलीसारख्या गंभीर गुन्ह्यांप्रकरणी तो भारतास हवा होता. गेली दोन दशके भारत चेतियाच्या हस्तांतरणासाठी पाठपुरावा करीत होता. मात्र, उभय देशांत प्रत्यार्पण करार नसल्याचे सांगून तेथे आतापर्यंत सत्तेवर आलेल्या सरकारांनी त्याच्या हस्तांतरणास नकार दिला होता. मात्र,अलीकडे स्वत: चेतिया यानेच ‘आपण भारतात परतण्यास उत्सुक आहोत’, असा लेखी अर्ज दिल्यानंतर बांगलादेशातील हसीना सरकारने त्याला भारतात परत पाठविण्याचा निर्णय घेतला.-------चेतियाची पार्श्वभूमी...१९९० च्या दशकात चेतिया हिंसक कारवायांनंतर भूमिगत झाला. त्यानंतर मार्च १९९१ मध्ये त्याला अटक करण्यात आली; पण आसामचे मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांनी त्याला कारागृहातून जामिनावर सोडून दिले आणि मुक्तता होताच तो फरार झाला. तेव्हाच तो बांगलादेशात गेला असण्याची अटकळ होती. ती खरी ठरली. २१ डिसेंबर १९९७ रोजी त्याला हसीना यांच्या पहिल्या राजवटीत बांगलादेश सरकारने अटक केली होती. त्यावेळी त्याला विदेशी नागरिक कायदा, पासपोर्ट कायदा यांचा भंग केल्याचा आणि बांगलादेशात अवैध प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. याशिवाय बेकायदेशीरपणे विदेशी चलन, शस्त्रास्त्रे आणि सॅटेलाईट फोन बाळगणे आदी आरोपही ठेवण्यात आले होते. त्यासाठी ठोठावलेली सात वर्षांची शिक्षा तेथे भोगल्यावर त्याने राजकीय शरणार्थी म्हणून आपला स्वीकार करण्याची विनंती बांगलादेश सरकारला तीनदा केली. त्यावर सरकारने निर्णय घेतला नव्हता. परिणामी हा निर्णय होत नाही, तोवर सुरक्षिततता म्हणून चेतियाला तुरुंगातच ठेवण्याचा आदेश ढाका हायकोर्टाने दिला होता.---------पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रत्यार्पणासाठी केलेल्या सहकार्याबद्दल शेख हसीना यांचे आभार मानले आहेत.