उचगावला वाहतूक पोलिसांची मागणी
By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST
उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथे वाहतूक शाखेचा पोलीस तैनात करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे. वारंवार होणारे अपघात आणि वाहनधारकांची बाचाबाची यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्यावर नेहमी अपघात होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.
उचगावला वाहतूक पोलिसांची मागणी
उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथे वाहतूक शाखेचा पोलीस तैनात करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे. वारंवार होणारे अपघात आणि वाहनधारकांची बाचाबाची यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्यावर नेहमी अपघात होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.गांधीनगर पोलीस ठाण्याकडून या मार्गावर वाहतूक पोलीस नेमण्यात यावा, कारण येथे अवघड वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच वडाप रिक्षाचीही अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. या मार्गावर पोलीस नेमण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)------------------------