शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पठाणकोट हवाई दलाच्या तळावर आणखी २ दहशतवादी, कारवाई अंतिम टप्प्यात

By admin | Updated: January 4, 2016 15:19 IST

पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर आणखी २ दहशतवादी लपले असून ही कारवाई आता अंतिम टप्प्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

पठाणकोट, दि. ४ - गेल्या तीन दिवसांपासून पठाणकोट हवाई तळावर सुरू असलेली चकमक अंतिम टप्प्यात आली असून अद्याप तेथे २ दहशतवादी लपल्याची माहिती एनएसजीच्या अधिका-यांनी दिली. 
सोमवारी दुपारी एनएसजी आणि हवाई दलाच्या अधिका-यांनी एअरबेसमध्ये पत्रकारपरिषद घेऊन सुरु असलेल्या कारवाई संदर्भात माहिती दिली. एअरबेसवरील हवाई दलाचे कर्मचारी रहात असलेल्या एका इमारतीमध्ये  हे अतिरेकी लपले असून, तिथे त्यांना घेरण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली. मात्र एअरबेसवरील सर्व कर्मचा-यांचे कुटुंबीय सुखरूप असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पठाणकोट हवाई दलाच्या अतिरेकी आणि सुरक्षापथकांमध्ये  चकमक सुरु झाली. शनिवारी चार अतिरेक्यांना कंठस्नान घातल्यानंतर मोहिम फत्ते झाली असा समज झाला होता. मात्र संध्यकाळी शोधमोहिम सुरू असतानाच आणखी काही दहशतवादी लपले असल्याचे समोर आले आणि पुन्हा चकमक सुरु झाली. आतापर्यंत ५ दहशतवादी ठार झाले असून अद्याप २ जण लपले आहेत. या कारवाईत आत्तापर्यंत ७ जवान शहीद झाले, त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याकत आले. 
 
पत्रकारपरिषदेतील महत्वाचे मुद्दे:
पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर सुरु असलेली मोहिम अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत पाच अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला असून, अजून दोघांविरोधात कारवाई सुरु आहे 
पठाणकोट येथील हवाई दल तळाच्या आतमध्ये रहाणारी सर्व कुटुंब सुरक्षित आहेत  
पठाणकोट येथील हवाई दल तळाचा परिसर खूप मोठा आहे, शोधमोहिम सुरु आहे, अजून बराचवेळ शोध मोहिम सुरु रहाण्याची शक्यता असून संपूर्ण परिसर पिंजून काढल्याशिवाय कारवाई संपल्याची घोषणा शक्य नाही
पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावरील अतिरेक्यांविरोधात एनएसजी आणि गरुडा कमांडो संयुक्तपणे कारवाई करत आहेत. 
 पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावरील विमानांना लक्ष्य करण्याचा अतिरेक्यांचा इरादा होता मात्र सर्व विमाने सुरक्षित आहेत