शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींवर खटले प्रलंबित

By admin | Updated: February 10, 2016 01:31 IST

देशातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये दोन कोटींवर खटले प्रलंबित असून यापैकी दहा टक्क्यांपेक्षा अधिक खटले दहा वर्षांपासून निपटाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. कायदे मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे.

नवी दिल्ली : देशातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये दोन कोटींवर खटले प्रलंबित असून यापैकी दहा टक्क्यांपेक्षा अधिक खटले दहा वर्षांपासून निपटाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. कायदे मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे.राष्ट्रीय न्यायालयीन डाटा ग्रीडच्या वेबसाईटवर उपलब्ध आकडेवारीनुसार ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत विविध राज्यांच्या जिल्हा न्यायालयांमध्ये एकूण २,६०,९९८ प्रकरणे प्रलंबित आहेत. यापैकी ८३ लाख ४६२ खटले (४१.३८ टक्के) गेल्या दोन वर्षांतील आहेत, तर २१ लाख ७२ हजार ४११ खटले (१०.८३ टक्के) दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून अडकले आहेत. ‘जस्टिस डिलिव्हरी अ‍ॅण्ड लीगल रिफॉर्म्स’ या विषयावर कायदे मंत्रालयातर्फे पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीसाठी तयार करण्यात आलेल्या दस्तावेजांमध्ये ही माहिती नमूद आहे. या आकडेवारीत देशातील सर्व न्यायालयांचा समावेश नसल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. मापदंड नाहीतएखादा खटला केव्हा प्रलंबित मानला जायचा यासंदर्भात कुठलेही मापदंड नसल्याने या क्षेत्रातील धोरण निर्मात्यांची मोठी अडचण होत असल्याचे कायदा मंत्रालयाचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)